Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. ते भारतीय राजकारण आणि नैतिकतेसाठी ओळखले जातात. प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्याची त्यांची हातोटी होती. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी त्यांनी चाणक्य नीती शास्त्राचा शोध लावला. आजवर आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी जीवनाचा मार्ग सुकर करण्यासाठी अनेक मार्ग सांगितले. 


आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात पैशांच्या योग्य वापराबद्दल देखील सांगितलं आहे. चाणक्यांच्या मते, व्यक्तीने नेहमी पैशांचा वापर विचारपूर्वकच केला पाहिजे. पण, काही गोष्टी अशा असतात ज्या ठिकाणी पैसा खर्च करताना संकोच करायचा नसतो. कारण या ठिकाणी पैसा खर्च करताना पैसा कमी होत नाही तर अधिक वाढतो. या जागा नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मुलांच्या शिक्षणावर खर्च करताना कंजूसी करु नका 


चाणक्यांच्या मते, मुलांच्या शिक्षणावर पैसे खर्च करताना कोणत्याही प्रकारचा जास्त विचार करु नये. कारण शिक्षणावर खर्च केलेला पैसा कधीच वाया जात नाही. तसेच, भविष्यात यातून दुप्पट लाभ मिळतो. कारण, यामुळे तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळतं. यामुळे ते नवीन गोष्टी शिकतात. 


गरिबांना मदत करा


आचार्य चाणक्यांच्या मतानुसार, नेहमीच गरिब लोकांची मदत करण्यास तत्पर असावे. आपल्या आणि आपल्या कुटुंबियांसाठी पैसा कमावणं वाईट नाही. पण त्या पैशांचा देखील योग्य वापर करणं गरजेचं आहे. तो असाच साठवून ठेवू नये. यासाठी समाजातील कमजोर, गरिबांची मदत करावी. 


समाजसेवा करा 


चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, तुमच्या उत्पन्नातील काही वाटा समाजकार्यासाठी देखील जोडणं गरजेचं आहे. तुम्ही एखाद्या शाळेत,हॉस्पिटलसारख्या संस्थांमध्ये पैसे दान करणं गरजेचं आहे. असे केल्याने तुम्हाला चांगलं पुण्य मिळेल. तसेच, तुमची आणखी प्रगती होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. 


आजारपणात मदत करायला विसरू नका 


आचार्य चाणक्यांच्या मते कधीही आजारी व्यक्तीची मदत करताना हात मागे राखू नये. तुम्ही तुमच्या सामर्थ्यानुसार, त्यांची मदत करु शकता. तुमच्या एका उपकाराने समोरच्या व्यक्तीला खूप मदत मिळू शकते. त्यामुळे देवाची नेहमीच तुमच्यावर कृपा राहील. 


धार्मिक स्थळांना दान करा 


चाणक्यानुसार, धार्मिक स्थळाला दान देतानाही कोणत्याच प्रकारची कंजूसी करु नये. एखाद्या ट्रस्टला किंवा मंदिराला दान केल्याने आपल्या जीवनात सकारात्मकता वाढते. त्यामुळे दान करत राहावं. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shani-Rahu Yuti : 2025 मध्ये 'या' दिवशी जुळून येणार शनी-राहूचा दुर्लभ संयोग; 3 राशींचं नशीब सोन्याहूनही पिवळं होणार