Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार प्रत्येक यशस्वी व्यक्तीचे शत्रू असतात. या शत्रूंपासून सावध राहावे. आचार्य चाणक्य यांच्या मते शत्रू देखील दोन प्रकारचे असतात. प्रथम जे दृश्यमान आहेत, दुसरे जे लपलेले आहेत. म्हणजेच ते दिसत नाहीत. शत्रू कोणताही असो त्याच्यापासून नेहमी सावध राहिले पाहिजे. अन्यथा संधी मिळाल्यास तो नुकसान करू शकतो. आचार्य चाणक्य यांच्यानुसार शत्रूचा पराभव करायचा असेल तर काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला हव्यात.  


वाईट संगत टाळा
चाणक्य नीतिनुसार व्यक्तीने आपल्या संगतीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जे लोक आपल्या सभोवताली चांगले आणि योग्य लोक ठेवतात. किंवा चांगल्या लोकांच्या सहवासात असतात त्यांना शत्रू घाबरतात. दुसरीकडे, माणसाची संगत जेव्हा वाईट लोकांसोबत असते तेव्हा शत्रू त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न करतो आणि संधी साधून हल्ला करतो. त्यामुळे माणसाने नेहमी चांगली संगत ठेवली पाहिजे.  


व्यसन तुम्हाला अडचणीत आणू शकते
चाणक्य नीतीनुसार, व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. नशा करणाऱ्यांना शत्रू सहज पराभूत करतात. नशा झालेला माणूस आपल्या बुद्धीचा आणि विवेकाचा योग्य वापर करू शकत नाही आणि अशी चूक करतो ज्याचा शत्रू पुरेपूर फायदा घेऊ शकतो. व्यसनामुळे आरोग्याचीही हानी होते. त्यामुळे त्यापासून दूर राहावे.
कठोर बोलण्याने संबंध बिघडतात.


चाणक्य नीतीनुसार वाईट किंवा कठोर शब्द बोलू नयेत. शत्रू त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. बोलणे बिघडल्याने नात्यांमध्ये अंतर वाढते. जवळची नातीही तुटायला लागतात. लोकांना वाईट बोलणाऱ्यांपासून दूर राहणे आवडते, याचाही प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होतो. म्हणून गोड वाणी बोलली पाहिजे.  


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :