Chanakya Niti : आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. ते भारतीय राजकारण आणि नैतिकतेसाठी ओळखले जातात. प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्याची त्यांची हातोटी होती. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी त्यांनी चाणक्य नीती शास्त्राचा शोध लावला. आजवर आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी जीवनाचा मार्ग सुकर करण्यासाठी अनेक मार्ग सांगितले.
चाणक्य यांनी सांगितलं आहे की, जर एखाद्या व्यक्तीकडे विविध मार्गांनी पैसा येतो पण तो हातात टिकत नाही. असं वाटत असेल तर यावर आचार्य चाणक्यांनी खास तोडगा दिला आहे. तो जाणून घेऊयात.
खरंतर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात पैसा खूप महत्त्वाचा आहे. मात्र, अनेकदा मेहनत करुन कमावलेला पैसा झटक्यात हातासरशी निघून जात असेल तर त्याबद्दल प्रत्येकाला वाईट वाटतं. चाणक्यांनी यावर एक मार्ग सांगितला आहे.
आचार्य चाणक्यांनी सांगितले दोन महत्त्वाचे नियम
1. आचार्य चाणक्य यांच्या मते, जर घरात आलेला पैसा टिकवायचा असेल, तर घरातील तांदळाचा डबा कधीही रिकामा होऊ देऊ नका. यामुळे घरात आर्थिक चणचण भासू शकते. तसेच, घरात येणारी लक्ष्मीही नाराज होते. यासाठी घरात कोणत्याच वस्तूची कमी पडू देऊ नका.
2. आचार्य चाणक्यांनी दुसरा मार्ग सांगितला आहे. तो म्हणजे घरातील पिठाच्या डब्यामध्ये एक चांदीचे नाणे ठेवा. त्या नाण्यावर लक्ष्मीचा किंवा गणपतीचा फोटो असावा. यामुळे घरात लक्ष्मीचा वावर टिकून राहील. घरातील वातावरण सकारात्मक राहील. तसेच, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. चांदी देखील घरातील सुख-शांतीसाठी, तसेच धन-धान्य संपत्तीसाठी फार महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे तुम्ही हा मार्ग देखील अवलंबू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :