Chanakya Niti : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांची धोरणे जगभरात प्रसिद्ध आहेत. आचार्य चाणक्य हे राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांची धोरणे राजे आणि सम्राटांनी स्वीकारली. आजच्या काळातही अनेक जण आपल्या जीवनाच्या विकासासाठी चाणक्य नीती (Chanakya Niti) वाचतात. आचार्य चाणक्यांनी आपल्या धोरणात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचा अवलंब केल्याने तुम्हाला जीवनात नक्कीच यश मिळेल. या गोष्टी आपल्या जीवनात उतरवल्या तर माणसाला नक्कीच यश मिळते.
व्यक्तीच्या विनाशाचे आणि यशाचे रहस्य
चाणक्यांनी सांगितले आहे की, एखाद्या व्यक्तीचा एखादा दोष काही प्रमाणात त्याच्या अपयशाचे कारण बनतो. तेव्हा त्या व्यक्तीच्या यशालाही अपयशाचे स्वरूप येते. आचार्य चाणक्य सांगतात की, व्यक्तीच्या विनाशाचे आणि यशाचे रहस्य त्यांच्या बोलण्यात दडलेले आहे. चाणक्याच्या मते माणसाच्या जिभेतून कडू आणि गोड शब्द बाहेर पडतात. जिभेमध्ये एवढी ताकद असते की ती वाईट कामं निर्माण करण्याची आणि नाती तोडण्याचीही क्षमता असते. चाणक्य म्हणतात की, श्रीमंत माणसाच्या बोलण्यात कटुता असेल तर त्याच्यापेक्षा गरीब कोणी नाही, पण जो गोड बोलतो आणि गरीब असतानाही बोलण्यावर संयम ठेवतो तो पूज्य आहे.
मधुर वाणी
आचार्य चाणक्य म्हणतात, माणसाने नेहमी गोड बोलले पाहिजे. यासोबतच इतर लोकांशी नम्रपणे वागले पाहिजे. ज्या व्यक्तीमध्ये हे दोन गुण असतात तो समाजात मान-प्रतिष्ठेला पात्र ठरतात. याशिवाय अशा लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा राहते. यामुळे त्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाही.
यशाचे अपयशात रूपांतर करण्याची ताकद
संयमित बोलण्याबद्दल चाणक्य सांगतात की, माणसाने जेवढे उपयुक्त आहे तेवढेच बोलावे, विनाकारण किंवा अपशब्द बोलण्यापेक्षा गप्प बसणे चांगले. शहाणा माणूस नेहमी संयमपणे बोलतो, कारण त्याचा एक शब्द त्याची प्रतिमा डागाळू शकतो हे त्याला चांगलेच माहीत असते. तोंडातून आलेला शब्द परत घेऊ शकत नाही. कडू बोलण्याने इतरांना त्रास होतो. यशाचे अपयशात रूपांतर करण्याची ताकद व्यक्तीच्या भाषणात असते.
बोलण्यापूर्वी 100 वेळा विचार करा
चाणक्याच्या मते, ज्यामध्ये वाणीवर संतुलन राखण्याची ताकद असते, तो सन्मानाने यश मिळवतो. बोलण्यापूर्वी 100 वेळा विचार करावा. शब्दांचा आघात असा आहे की तो मरेपर्यंत हृदयात राहतो. वाणीवर ताबा ठेवणाऱ्यांमध्ये जग जिंकण्याची क्षमता असते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या