Chanakya Niti :  आचार्य चाणक्य (Acharya Chankaya) हे केवळ भारताचे महान अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी नव्हते. आपल्या धोरणांच्या बळावर त्यांनी चंद्रगुप्त मौर्य या सामान्य बालकाला संपूर्ण भारताचा सम्राट बनवले होते. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली धोरणे केवळ राज्यकारभारासाठीच नव्हे तर आजही मानवी जीवनात अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्रामध्ये जीवनसाथी निवडण्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.


'या' मुली आपल्या पतीचे भाग्य उजळवतात.
पती-पत्नीचे नाते खूप महत्वाचे आहे. शास्त्रात सांगितले आहे की अशा अनेक स्त्रिया आहेत, ज्या आपल्या पतीचे भाग्य उजळवतात. असा बदल त्यांच्या नशिबात दिसतो जो लग्नापूर्वी झाला नव्हता. त्यामुळेच या बायका पतींसाठी भाग्यवान ठरल्याचं म्हटलं जातं. आचार्य चाणक्य देखील याचे समर्थन करतात आणि म्हणतात की, पत्नीचे काही विशेष गुण पतीला भाग्यवान बनविण्यात मदत करतात. जाणून घेऊया कोणते आहेत ते खास गुण.


वरयेत् कुलजन प्रग्यो विरुपमपि कन्यकम् । 


रूपशीलं न निश्चस्य विवाहः सदर्षे कुळे ।


वरील श्लोकानुसार चाणक्य नीतीच्या या श्लोकात सांगितले आहे की


-विवाहापूर्वी जोडीदार निवडताना व्यक्तीने शरीराऐवजी गुणांकडे पाहिले पाहिजे.
-चाणक्य नीतिनुसार पुरुषांनी सुंदर स्त्रियांच्या मागे धावू नये. आचार्य चाणक्य यांच्या मते पत्नी सद्गुणी असेल तर ती संकटाच्या वेळीही कुटुंबाची काळजी घेते.
-आचार्य चाणक्य यांच्या मते, स्त्रीला बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य जास्त असावे. तसेच, तिने संयम बाळगला पाहिजे.
-चाणक्य नीतीनुसार धर्म आणि कामावर किती श्रद्धा आहे हे लग्नाआधी कळायला हवे.
-क्रोध हा आचार्य चाणक्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. चाणक्य सांगतात की ज्या स्त्रीला खूप राग येतो ती कुटुंबाला कधीही सुखी ठेवू शकत नाही.
-आचार्य धोरणानुसार, स्वतःच्या इच्छेने लग्न न करणाऱ्या स्त्रीशी कधीही लग्न करू नये, अशी स्त्री तुम्हाला आनंदी ठेवू शकत नाही आणि तुमचा आदरही करू शकत नाही.


 कुटुंबातील सदस्यांची प्रगती
आचार्य चाणक्य म्हणतात की, कौटुंबिक जडणघडणीत पत्नींचे महत्त्वाचे योगदान असते. कारण सुशिक्षित आणि सुसंस्कृत स्त्री सून म्हणून घरात आली तर ती कुटुंबात एकोपा वाढवून घर व्यवस्थित करते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


संबंधित बातम्या


Chanakya Niti : असे कर्मचारी ऑफिसमध्ये सगळ्यांना प्रिय असतात, कोणतीही समस्या क्षणार्धात सोडवतात, चाणक्य म्हणतात..