Sushma Andhare : मुख्यमंत्री एकनाथ भाऊ आहेत हा गैरसमज ठेवू नका. कारण, सर्व कामे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याच इशाऱ्यानं होतात असं वक्तव्य शिवसेना (Shiv sena) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केलं. महाप्रबोधन यात्रेनिमित्त कल्याणमध्ये आयोजित केलेल्या सभेत अंधारे यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार टीका केली. काही दिवसांपूर्वी एका गाडीत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बाजूला बसले होते आणि स्टेयरिंग देवेंद्र फडणवीस यांच्या हातात होतं. हेच खरं चित्र असल्याचा खोचक टोला अंधारेंनी लगावला. माझे 40 भाऊ कॉपी करून पास झाले आहेत. त्यांना कळत नाही सगळी मलिद्याची खाती भाजपकडे गेली आहेत. माझ्या भावांकडे सगळी खाती कपडे फाडण्याची आहेत असा टोलाही अंधारेंनी शिंदे गटातील आमदारांना लगावला.


उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाल्याचे पाहायला मिळेल


महाप्रबोधन यात्रेला राज्यात प्रतिसाद चांगला मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता आम्हाला खात्री आहे की येत्या निवडणुकीत उद्धवसाहेब मुख्यमंत्री पदाची शपथ घेतानाचे चित्र पाहायला मिळेल, असा विश्वासही अंधारे यांनी बोलून दाखवला. यावेळी अंधारे यांनी सभेत किरीट सोमय्या यांचे काही व्हिडीओ देखील दाखवले. यामध्ये त्यांनी नारायण राणे, प्रताप सरनाईक, भावना गवळी, यशवंत जाधव, आनंद अडसूळ, अर्जुन खोतकर यांच्यावर आरोप केले होते. किरीट सोमय्या यांनी ज्यांच्यावर आरोप केले, त्यांच्याच चौकशा आता का थांबल्या असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


बिकेसीला करोडो रुपयांचा चुराडा झाला तरी सोमय्या गप्प का?


अंधारे यांनी आपल्या भाषणात नाव न घेता भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर देखील टीका केली. संजय राठोड हे आता निर्दोष वाटत असतील तर पूजा राठोडची जाणीवपूर्वक बदनामी केली. तिची राजकीय शिडी केल्याचा आरोप अंधारे यांनी केला. बिकेसीला मेळावा झाला, करोडो रुपयांचा चुराडा झाला तरी  किरीट सोमय्या गप्प का? असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला. आंदोलन करणारे अण्णा हजारे आता कुठे गेले? आता लवकर उठा, असा टोलाही त्यांनी आण्णा हजारेंना लगावला.


महापुरुषांचे अपमान होत असतानाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गप्प बसलेत


महापुरुषांचे अपमान होताना देवेंद्र फडणवीस गप्प बसलेत असेही अंधारे म्हणाल्या. कर्नाटकमध्ये आमच्या गाड्या तोडतात, त्यांचे मुख्यमंत्री आक्रमकपणे बोलतात पण आमचे मुख्यमंत्री जेवायला, गरबा खेळायला, गुवाहाटीला जातात असेही त्या म्हणाल्या. महापुरुषांचा अवमान होत आहे. महाराष्ट्र कर्नाटक वाद पेटलाय, त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चकार एक शब्दही बोलत नाहीत. देवेंद्र फडणवीस साधा निंदाजनक ठरावही मांडत नाही असे अंधारे म्हणाल्या. तुम्हाला सावरकर इतके प्रिय होते तर त्यांना भारतरत्न का नाही दिला नाही? गुजरातमध्ये सर्वात मोठा पुतळा उभारताना सावरकरांचा पुतळा का नाही उभारला ? असा सवालही अंधारेंनी भाजप नेत्यांना केला. ज्या पद्धतीने सदाभाऊ खोत, पंकजा मुंडे, बच्चू कडू यांची अवस्था झाली तशीच अवस्था या 40 जणांची होणार आहे.
माझे 40 भाऊ कॉपी करून पास झाले आहेत. त्यांना कळत नाही सगळी मलिद्याची खाती भाजपकडे गेली आहेत. माझ्या भावांकडे सगळी खाती कपडे फाडण्याची आहेत असा टोलाही अंधारेंनी शिंदे गटातील आमदारांना लगावला.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Politics Shiv Sena: ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे 20 लाख पक्ष सदस्यांचे अर्ज, शिंदे गटाचे किती सदस्य?