Capricorn Weekly Horoscope 02 to 08 September 2024 : राशीभविष्यानुसार, मकर (Capricorn) राशीसाठी हा काळ वरदानाप्रमाणे असेल. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मकर राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


मकर राशीचे लव्ह लाईफ (Capricorn Love Horoscope)


रिलेशनशिपच्या बाबतीत नवीन आठवडा तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुमचं तुमच्या पार्टनरबरोबर स्ट्रॉंग कनेक्शन तयार होईल. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या भावना वेळीच व्यक्त करा. तुमच्या पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्या. 


मकर राशीचे करिअर (Capricorn Career  Horoscope)


आठवड्याचा पहिल्या आठवड्यात नेमून दिलेल्या कामांवर लक्ष केंद्रित करा. कार्यालयीन राजकारण बाजूला ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचा स्वभाव स्थिर ठेवा आणि तुमच्या वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय वाढवू पाहणारे उद्योजक आठवड्याच्या सुरुवातीला प्रयत्न करतील.


मकर राशीची आर्थिक स्थिती (Capricorn Wealth Horoscope)


नवीन आठवड्यात तुमच्या हाती पैसा येईल. भविष्यासाठी बचत करणं हे तुमचं प्राधान्य असावं. या आठवड्यात तुम्हाला अनेक स्त्रोतांतून पैसे मिळू शकतात. ज्यांना इलेक्ट्रॉनिक उत्पादनं खरेदी करायची आहे ते आठवड्याच्या शेवटी ते खरेदी करू शकतात. शेअर बाजार आणि व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आठवड्याचा पहिला भाग चांगला आहे, तुम्हाला चांगला परतावा मिळेल. पण तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यायला विसरू नका.


मकर राशीचे आरोग्य (Capricorn Health Horoscope)


तुमची काही औषधं सुरू असतील तर ती घ्यायला विसरू नका. वृद्धांनी जिने चढताना-उतरताना आणि बसमध्ये चढतानाही काळजी घ्यावी. तेलकट आणि मसालेदार पदार्थांचं सेवन कमी करा. त्याऐवजी आहारात पालेभाज्यांचा अधिक समावेश करा. दम्याच्या रुग्णांनी बाहेर प्रवास करताना काळजी घ्यावी. तुम्ही सहलीची योजना आखत असाल, तर तुमच्यासोबत मेडिकल किट असल्याची खात्री करा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Sagittarius Weekly Horoscope 02 to 08 September 2024 : नवीन आठवड्यात प्रगतीसाठी मिळतील अनेक संधी; वाचा धनु राशीचं साप्ताहिक राशीभविष्य