Cancer Weekly Horoscope 29 April to 5 May : कर्क राशीला नवीन आठवड्यात अनेक समस्यांचा सामना करावा लगेल, त्यामुळे सावध राहा. या आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्या जाणवतील. तुमची आर्थिक बाजू तशी मजबूत राहील. या आठवड्यात जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या लव्ह लाईफमध्ये टोकाची भूमिका घेऊ नका. एकूणच कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? कर्क राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
कर्क राशीची लव्ह लाईफ (Cancer Love Horoscope)
नवीन आठवड्यात प्रेमसंबंधांतील नात्यात मोठ्या बदलांसाठी तयार राहा. तुमच्या जोडीदाराच्या भावनांची कदर करा. तुम्ही काहीही बोलून तुमच्या जोडीदाराला दुखवू नका. नात्यातील अडचणी हुशारीने सोडवा. तुमच्या जोडीदाराला पर्सनल स्पेस द्या, यामुळे नात्यात प्रेम आणि विश्वास वाढेल. तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. भूतकाळातील गोष्टींवर जास्त चर्चा करू नका. काही लोकांना त्यांचं नातं टॉक्सिक वाटू शकतं, अशा नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.
कर्क राशीचे करिअर (Cancer Career Horoscope)
या आठवड्यात तु्म्हाला व्यावसायातील तुमचा दरारा दाखवण्याच्या अनेक संधी मिळतील. या आठवड्यात आयटी, हेल्थकेअर, लॉ, हॉस्पिटॅलिटी, इंजिनीअरिंग आणि डिझायनर्सचं शेड्युल पॅक असेल, तुमच्यावर कामाचा जास्त लोड असेल. नोकरदारांनी कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावं आणि प्रगतीच्या नवीन संधी शोधाव्या. या आठवड्यात कामादरम्यान रागावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक वाद टाळा.
कर्क राशीची आर्थिक स्थिती (Cancer Wealth Horoscope)
नवीन आठवड्यात तुम्ही आर्थिक बाबतीत भाग्यवान राहाल. पैशासंबंधी घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. धर्मादाय कार्यात तुम्ही पैसा खर्च करू शकता. मित्र किंवा नातेवाईकांसोबत चालू असलेले आर्थिक वाद सोडवण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या शेवटी तुम्ही घर किंवा जमिनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकता. या आठवड्यात शेअर बाजार आणि नवीन व्यवसायातील गुंतवणूक पर्यायांवर लक्ष ठेवा.
कर्क राशीचे आरोग्य (Cancer Health Horoscope)
या आठवड्यात तुमच्यावर ऑफिसमध्ये कामाचा लोड असेल, ऑफिसचा ताण तु्म्ही घरी आणू नका. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. रोज योगा आणि व्यायाम करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: