Budh Shani Yuti 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक वेळेनंतर उदय होतात, अस्त होतात आणि इतर ग्रहांशी युती देखील करतात. यातच फेब्रुवारीमध्ये ग्रहांचा राजकुमार बुध कुंभ राशीत उदय होणार आहे. शनि देखील कुंभ राशीत आधीच विराजमान आहे. अशा स्थितीत, कुंभ राशीत शनि आणि बुधाची युती होईल. यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं. या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


बुध आणि शनीची युती तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. कारण हा संयोग तुमच्या राशीच्या 11व्या घरात होणार आहे. त्यामुळे तुमचं उत्पन्न वाढू शकतं. तसेच तुम्ही नवीन स्त्रोतांद्वारे पैसे कमवू शकता. या काळात या राशीचे विद्यार्थी जे सरकारी नोकरीची तयारी करत आहेत त्यांना यश मिळू शकतं. तुम्हाला गुंतवणुकीचा लाभ देखील मिळू शकतो. तसेच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तुम्हाला शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकतो.


मिथुन रास (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध आणि शनीची युती शुभ ठरू शकते. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रलंबित कामात यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी खूप प्रगती होऊ शकते. यशाच्या नवीन संधी मिळतील, ज्या तुमच्यासाठी फलदायी ठरतील. लोकांमध्ये तुमची एक खास ओळख निर्माण होईल. या काळात संपत्तीत वाढ होण्याची शक्यताही आहे. तसेच या काळात तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.


मकर रास (Capricorn)


शनि आणि बुधाची युती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच हा काळ आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. तंदुरुस्ती आणि मानसिक शांतता राखली जाईल. या काळात तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला फळ मिळेल. नोकरीच्या नवीन संधी देखील उपलब्ध होऊ शकतात. विद्यार्थी उच्च शिक्षणात यश मिळवतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Kuber Dev : कुबेराला 'या' 3 राशी अत्यंत प्रिय; कधीच बसू देत नाहीत यांना आर्थिक झळ, देतात अपार पैसा आणि पद-प्रतिष्ठा