Budh Gochar 2024 : आज 4 डिसेंबरचा 2024 दिवस. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध (Mercury) ग्रहाचं लवकरच संक्रमण होणार आहे. बुध ग्रहाला ज्योतिष शास्त्रात, ग्रहांचा राजकुमार असं म्हणतात. बुध ग्रह हा धन-संपत्ती, व्यापार, वाणी आणि संवादाचा कारक आहे. बुधच्या संक्रमणाचा काही राशींच्या (Zodiac Signs) लोकांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
बुध ग्रह 4 सप्टेंबर 2024 पासून ते 23 डिसेंबर 2024 पर्यंत सिंह राशीत विराजमान असणार आहे. बुध ग्रहाचं सूर्याच्या (Sun) सिंह राशीत संक्रमण हे खास प्रभाव पाडणार आहे. याचा काही राशींच्या लोकांवर सकारात्मक तर काही राशींच्या लोकांवर नकारात्मक परिणाम होणार आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
बुध ग्रहाचं संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी फार आव्हानात्मक असणार आहे. या दरम्यान तुम्ही प्रामाणिकपणे व्यवहार करण्याची गरज आहे. या काळात चुकूनही कोणाशी खोटं वागण्याचा प्रयत्न करु नका. अन्यथा तुम्ही फसू शकता. तसेच, कामाच्या ठिकाणी सर्वांशीच चांगला व्यवहार करा. जर तुम्हाला नवीन वाहनाची खरेदी करायची असेल तर त्यासाठी हा काळ उत्तम नाही. यासाठी तुम्ही काही काळ प्रतीक्षा करण्याची गरज आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
बुध ग्रहाचं संक्रमण धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ फार आव्हानात्मक असणार आहे. या दरम्यान तुम्हाला नशिबाची साथ मिळणार नाही. तसेच, प्रगतीसाठी तुम्हाला अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. या काळात जर तुम्ही कोणाला वचन दिलं असेल तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. त्यामुळे कोणालाही वचन देताना आधी 10 वेळा नीट विचार करा.
मीन रास (Pisces Horoscope)
बुध ग्रहाचं संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी कठीण असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच, जर तुम्हाला डोळ्यांसंबंधित काही समस्या असतील तर वेळीच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची देखील काळजी घ्या. या काळात तुम्ही बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ काणे टाळावे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Mahadasha: शनीची महादशा अत्यंत धोकादायक; 19 वर्षे व्यक्तीला क्षणोक्षणी सहन करावा लागतो त्रास, 'हे' उपाय करा!