Shani Mahadasha: शनीची महादशा अत्यंत धोकादायक; 19 वर्षे व्यक्तीला क्षणोक्षणी सहन करावा लागतो त्रास, 'हे' उपाय करा!

Shani Mahadasha: शनिदेव हे न्यायाचं दैवत मानलं जातं. असं म्हटलं जातं की, शनी देव लोकांना त्यांच्या-त्यांच्या कर्मानुसार फळ देतं. अशातच, शनीची महादशा खूप महत्त्वाची मानली जाते.

Shani Mahadasha

1/11
नऊ ग्रहांपैकी शनी महादशा ही सर्वाधिक काळ चालणारी महादशा आहे. शनीच्या महादशामध्ये व्यक्तीला त्याच्या कर्मांचं फळ मिळतं.
2/11
शनीची महादशा खूप क्लेशदायक असते. जिथे साडेसाती (Sadesati) सात वर्षांची आणि ढैय्या (Dhaiya) अडीच वर्षांची. तर शनी महादशा 19 वर्ष टिकते. त्यामुळे ते अत्यंत धोकादायक मानली जाते.
3/11
ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या पत्रिकेत शनीची साडेसाती आणि ढैय्या दिसतात. त्याचप्रमाणे शनि महादशाही दिसते. शनीची महादशा माणसाला साडेसाती आणि ढैय्यापेक्षा जास्त त्रास देते.
4/11
शनीच्या महादशेच्या काळात व्यक्तीला खूप त्रास होतो आणि अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं.
5/11
शनिदेवाची महादशा देखील अधिक धोकादायक आणि वेदनादायक मानली जाते कारण एकीकडे शनीच्या साडेसातीचा प्रभाव सात वर्ष टिकतो तर दुसरीकडे ढैय्याचा प्रभाव अडीच वर्ष टिकतो.
6/11
दुसरीकडे, शनी महादशाचा कालावधी 19 वर्ष आहे. अशा परिस्थितीत ज्या व्यक्तीवर शनीची महादशी असते, त्यांना दीर्घकाळ त्रास सहन करावा लागतो.
7/11
शनी महादशेमुळे व्यक्तीची प्रतिष्ठा कमी होते, पैसा जातो, अपमान होतो, तणाव वाढतो, वाद होतात, मौल्यवान वस्तू हरवतात किंवा चोरीला जातात.
8/11
ज्योतिष शास्त्रानुसार, या सर्व समस्या शनी महादशेचं लक्षण मानलं जातं. मात्र यासोबतच शनी महादशेचा प्रभाव कमी करण्यासाठी उपायही सुचवण्यात आले आहेत.
9/11
शनीची महादशा चालू असेल तर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावून झाडाला तीन वेळा प्रदक्षिणा घालावी. तसेच, शनिदेवाच्या बीज मंत्राचा 108 वेळा जप करावा.
10/11
शनिवारी शनिदेवाशी संबंधित काळ्या रंगाच्या वस्तू जसं की उडीद डाळ, कपडे, घोंगडी, काळे तीळ, मोहरीचं तेल इत्यादी गरीब किंवा गरजूंना दान करावं. या कृतींमुळे शनि महादशेचा प्रभाव कमी होतो.
11/11
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola