Baba Venga: 2025 पासून माणुसकीचा अंत व्हायला सुरूवात? 9/11 हल्ला, दुसरे महायुद्ध, 2004 त्सुनामीप्रमाणे बाबा वंगांची ही भविष्यवाणीही खरी होणार? जाणून घ्या..
Baba Venga: बाबा वंगा यांनी 2025 साठी भविष्यवाणी केलीय की, वर्ष 2025 च्या सुरुवातीला सर्वनाशाची सुरूवात होऊ शकते. त्यांच्या या भाकितामुळे सर्व सामान्य लोकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

Baba Venga Prediction: सध्या जगात विविध घडामोडी पाहायला मिळत आहेत. ज्याचे पडसाद सर्वसामान्य जनतेवर पडताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी हल्ला केला. ज्यामुळे माणुसकी कुठे तरी संपत आलीय का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. जगभरात होणाऱ्या अशा घटनांकडे पाहता बाबा वंगा यांचे भाकीत जगभरात चर्चेचा विषय आहे. त्यांच्या भाकितांचा प्रभाव राजकीय आणि जागतिक स्तरावर दिसून येतो. बाबा वंगा यांनी नवीन महासत्तांचा उदय, राष्ट्रांचा उदय आणि पतन तसेच जागतिक राजकारण इत्यादी महत्त्वाच्या बदलांबद्दल भाकीत केले होते. बाबा वंगा यांनी विविध देशांना इशाराही दिला होता की, 2024 हे वर्ष जगभरात अनपेक्षित घटना घडतील, ज्यामुळे जगात अशांतता असेल. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2024 मध्ये जगाने अशा अनेक अनपेक्षित घटना पाहिल्या. मात्र 2025 मध्ये दोन दिवसांपूर्वी पहलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी घटनेकडे पाहता बाबा वंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, खरंच 2025 वर्षापासून मानवतेचा अंत व्हायला सुरूवात झालीय का? असा प्रश्न जनतेला पडतोय..
जगाचा अंत 2025 पासून सुरू होणार?
बाबा वंगा यांनी 2025 साठी भविष्यवाणी केलीय की, वर्ष 2025 च्या सुरुवातीला सर्वनाशाची सुरूवात होऊ शकते. त्यांच्या या भाकितामुळे त्यांच्या सामान्य लोकांमध्ये गंभीर चिंता निर्माण झाली आहे. वंगा यांनी युरोपमध्ये मोठ्या संघर्षाचा अंदाजही वर्तवला आहे, 2025 पर्यंत याच खंडातील मोठ्या लोकसंख्येचा नाश होईल असे भाकित बाबा वंगानी केले आहे. बाबा वांगाच्या भविष्यातील भविष्यवाण्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की जगाचा अंत 2025 पासून सुरू होईल, तसेच 5079 पर्यंत माणुसकी पूर्णपणे नष्ट होईल. बाबा वंगानी केलेल्या भविष्यवाणीपैकी एक चिंताजनक भविष्यवाणी म्हणजे, 2043 पर्यंत युरोप मुस्लिमांच्या अधिपत्याखाली येईल आणि 2076 पर्यंत जगभरात कम्युनिस्ट राजवट परत येईल असे भाकीत केलंय. 5079 मध्ये नैसर्गिक घटनेमुळे जगाचा अंत होईल असे वंगानी ठामपणे सांगितलंय.
बाबा वंगा कोण होते?
बाबा वंगांबद्दल सांगायचं झालं तर, बाबा वंगा यांचे पूर्ण नाव वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा होते. त्यांचा जन्म 1911 मध्ये झाला. वयाच्या 12 व्या वर्षी एका भयावक वादळात अडकल्यानंतर त्या अंध झाल्या. या घटनेनंतर, त्यांना काही अनपेक्षित गोष्टींची पूर्वकल्पना येऊ लागली, ज्याची क्षमता त्यांनी विकसित केली, ज्यामुळे त्यांच्या भविष्यवाणीसाठी त्यांची कीर्ती झाली. बाबा वंगांना "बाल्कनचा नॉस्ट्रॅडॅमस" म्हणून ओळखले जाऊ लागले. जागतिक घडामोडींच्या भाकितांसोबतच त्यांनी स्वतःच्या मृत्यूचीही भविष्यवाणी केली होती. जी खरी ठरली होती.
त्यांचे भूतकाळातील कोणते भाकीत खरे ठरले?
बाबा वंगा यांनी अनेक महत्त्वाच्या घटनांचे भाकीत केले आहे, ज्यापैकी अनेकांनी त्यांच्या कथित अचूकतेसाठी लक्ष वेधले आहे.
दुसरे महायुद्ध: बाबा वंगा यांनी केलेल्या भाकितानुसार, जागतिक संघर्षादरम्यान होणाऱ्या विध्वंस आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली होती.
9/11 हल्ला: बाबा वंगा यांनी अमेरिकेतील 9/11 च्या हल्ल्याचीही भविष्यवाणी केली होती. त्यांनी केलेली ही भविष्यवाणी खरी ठरली आहे.
2004 त्सुनामी: बाबा वंगा यांनी हिंद महासागरात आलेल्या विनाशकारी त्सुनामीचाही त्यांनी अंदाज वर्तवला होता, ज्यामुळे अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली होती.
1985 भूकंप: घराच्या जवळ, वांगा यांनी 1985 मध्ये झालेल्या उत्तर बल्गेरियातील भूकंपाचा अंदाज लावला.
सोव्हिएत युनियनचे विघटन: बाबा वंगा यांनी 1991 मध्ये यूएसएसआरच्या पतनाचा अंदाज वर्तवला होता, त्यानंतर कम्युनिस्ट राजवटीचा अंत अचूकपणे भाकीत केला होता.
स्टॅलिनचा मृत्यू: वांगाने सोव्हिएत नेते जोसेफ स्टॅलिनच्या मृत्यूची अचूक भविष्यवाणी केली आणि भविष्यवक्ता म्हणून तिची ख्याती मजबूत केली.
कुर्स्क पाणबुडी: 2000 मध्ये, त्यांनी रशियन पाणबुडी बुडण्यापूर्वी "कुर्स्क" चा समावेश असलेल्या शोकांतिकेचा उल्लेख केला.
हेही वाचा..
May 2025 Lucky Zodiac Sign: मे महिन्यात 'या' 5 राशी असतील भाग्यशाली! आयुष्यातला सर्वात मोठा आर्थिक फायदा होणार, सूर्याचा राशीबदल करणार चमत्कार
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.)



















