एक्स्प्लोर

Ram Mandir Opening : राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांना मिळणार 'हा' खास प्रसाद; पाहा यात काय-काय मिळणार

Ram Mandir Prasad: सध्या रामललाच्या तात्पुरत्या मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून वेलचीचे दाणे दिले जात आहेत. पण प्राण प्रतिष्ठेदिवशी मिळणाऱ्या प्रसादाच्या बॉक्समध्ये काय काय असणार? जाणून घ्या.

Ram Mandir Prasad : रामललाच्या अभिषेकसाठी येणाऱ्या निमंत्रित पाहुण्यांना एका खास बॉक्समध्ये प्रसाद मिळणार आहे. हा प्रसाद रामलल्लाच्या (Ram) अभिषेक समारंभासाठी आमंत्रित पाहुण्यांसाठी खास असणार आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने पाहुण्यांना देण्यासाठी प्रसादाची 15 हजार पाकिटं तयार केली आहेत. या प्रसादाच्या पाकिटात गुळासोबत रेवडी, रामदाणे चिक्की, अक्षता, दिवा आणि रोळी देखील प्रसाद म्हणून मिळणार आहे. हा प्रसादाचा बॉक्स खास पद्धतीने पॅक करण्यात आला आहे आणि प्रसादाच्या पाकिटात विशेषत: विष्णूला प्रिय असलेली तुळशीची डाळही देखील देण्यात आली आहे.

प्रसादात आणखी खास काय?

यासोबतच रामललाच्या प्रसादात वेलचीचे दाणेही देण्यात आले आहेत. सध्या रामललाच्या तात्पुरत्या मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून वेलचीचे दाणे दिले जात आहेत, त्यामुळे त्याचाही प्रसादात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय या प्रसादाच्या पाकिटात रक्षासूत्र देखील दिले जाते. यासोबतच 'राम दिवा' देखील पॅकिंगमध्ये असेल, ज्याचा वापर करून लोक राम ज्योती पेटवू शकतात. याशिवाय सुक्या मेव्याच्या लाडूंचाही या प्रसादात समावेश आहे.

भव्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज

प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अयोध्या नगरी पूर्णपणे सजली असून रामनगरी यावेळी भक्तिरसात तल्लीन झाली आहे. राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी अयोध्येत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अयोध्येतील धरमपथ आणि रामपथ येथून भाविकांची मोठी गर्दी होत असताना, पोलीस रस्त्यावर गस्त घालताना दिसतात. रामललाच्या अभिषेक सोहळ्यासाठी राम मंदिर फुलांनी आणि विशेष दिव्यांनी सजवण्यात आलं आहे. मंदिर ट्रस्टच्या सूत्रांनी सांगितलं की, सजावटीसाठी फुलांचा "समृद्ध साठा" वापरण्यात आला आहे आणि 22 जानेवारी रोजी होणार्‍या सोहळ्याच्या दृष्टीने मंदिर सजवण्यासाठी फुलांचे विशेष डिझाईन तयार करण्यात आले आहे.

रामलल्ला प्राण प्रतिष्ठापनेचा मुहूर्त कोणता?

अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येईल. सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12.29 मिनिटांच्या मुहूर्तावर हा प्राणप्रतिष्ठापनेचा विधी करण्यात येईल. अवघ्या 32 सेकंदाचा मुहूर्त या प्राणप्रतिष्ठापनेसाठी काढण्यात आलाय. तसेच मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 84 सेकंदांचा मुहूर्त असणार आहे. 

प्राणप्रतिष्ठापनेसाठी 22 जानेवारीचाच दिवस का?

सोमवार 22 जानेवारी रोजी शुभ मृगाशिरा नक्षत्र पहाटे 3 वाजून 52 मिनिटांनी सुरु होणार आहे. तसेच मंगळवार 23 जानेवारीला पहाटे 4 वाजून 58 मिनिटांपर्यंत हा मुहूर्त कायम राहणार आहे. परंतु 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजून 51 मिनिटे आणि दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत अभिजात मुहूर्त असणार आहे. त्यामुळे 22 जानेवारी 2024 चा मुहूर्त हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी निवडण्यात आलाय. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Ramlala Pran Pratishtha at home : उद्या 22 जानेवारीला रामलला प्राणप्रतिष्ठादिनी घरी पूजा कशी करावी? जाणून घ्या विधी आणि साहित्य

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026 : पवित्र तरीही देवी दुर्गेला तुळस का अर्पण करत नाहीत? वाचा यामागचं धार्मिक आणि शास्त्रीय कारण
पवित्र तरीही देवी दुर्गेला तुळस का अर्पण करत नाहीत? वाचा यामागचं धार्मिक आणि शास्त्रीय कारण
Shardiya Navratri 2026: घटस्थापना करताना धान्य का पेरतात? नवरात्री अन् धान्याचा संबंध काय? शेवटच्या दिवशी अंकुराचे काय करावे? धार्मिक महत्त्व..
घटस्थापना करताना धान्य का पेरतात? नवरात्री अन् धान्याचा संबंध काय? शेवटच्या दिवशी अंकुराचे काय करावे? धार्मिक महत्त्व..
Weekly Horoscope : कुंभ, मीन राशींना ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे योग! संपत्तीत होईल वाढ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशींना ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात धनलाभाचे योग! संपत्तीत होईल वाढ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींना ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींना ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut on PM Modi: भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
भाजप आणि संघाचे चार बडे नेते वेगळ्या मनस्थितीत, लवकरच मोठा निर्णय घेणार; संजय राऊतांचा दावा
Embed widget