Astrology : महिलांनो, आत्ताच तुमच्या 'या' वाईट सवयी सोडा; अन्यथा आयुष्यभर राहील अठरा विश्व दारिद्र्य
Astrology : देवी लक्ष्मीची पूजा सुख-समृद्धीकारक मानली जाते. मात्र, महिलांच्या अशा काही सवयी आहेत ज्यामुळे लक्ष्मी नाराज होते आणि कुटुंबात अशांतता पसरते.
Astrology : हिंदू धर्मशास्त्रात महिलांना देवीसमान दर्जा देण्यात आला आहे. महिलांना (Women) घरची लक्ष्मी म्हटलं जातं. देवी लक्ष्मीची (Lord Lakshmi) पूजा सुख-समृद्धीकारक मानली जाते. मात्र, महिलांच्या अशा काही सवयी आहेत ज्यामुळे लक्ष्मी नाराज होते आणि कुटुंबात अशांतता पसरते. तसेच, आर्थिक चणचण जाणवते.
हिंदू धर्म मान्यतेनुसार, महिलांमध्ये असे कोणते अवगुण आणि सवयी आहेत ज्याचा महिलांनी त्याग करणं गरजेचं आहे ते जाणून घेऊयात.
महिलांच्या 'या' सवयींमुळे देवी लक्ष्मी नाराज होते
घराच्या उंबरठ्यावर कधीही हे काम करु नका
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, घराच्या उंबरठ्यात देवी लक्ष्मीचा वास असतो. असं म्हणतात की, लक्ष्मी नेहमी प्रवेश द्वारातूनच घरात प्रवेश करते. अशा वेळी ज्या महिला केर काढल्यानंतर घराचा कचरा उंबरठ्यावरच एकत्र करुन सोडत असतील तर देवी लक्ष्मी अशा महिलांवर नाराज होते.
तसेच, घराच्या उंबरठ्यावर महिलांनी श्रृंगार, भोजन किंवा कोणत्याही प्रकारची देवाण-घेवाण करु नये. यामुळे दारिद्र्य येते.
पिठाचा जपून वापर करा
अनेकदा महिला रात्री उरलेल्या कणिकला फ्रीजमध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी त्याची पोळी बनवतात. जर तुमचीही ही सवय असेल तर आजच सोडून द्या. यामुळे तुम्हाला राहूच्या दुष्प्रभावांचा सामना करावा लागतो. तसेच, आरोग्यासह तुमच्या सुख-समृद्धीवरही याचा परिणाम होतो.
'या' वस्तूंना चुकूनही पाय लावू नका
महिलांनी झाडूला कधीच पाय लावू नये. झाडूला देवी लक्ष्मीचं स्वरुप मानण्यात आलं आहे. यामुळे पैशांची तंगी भासू लगाते. तसेच, घराची साफसफाई करताना नेहमी सूर्योदयापूर्वी करावी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर कधीही केरकचरा काढू नये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घराच्या मुख्य दरावाजाला कधीच पायांनी उघडू नये.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :