एक्स्प्लोर

Astrology : तुम्हीही रविवारी काळ्या रंगाचे कपडे घालताय? जाणून घ्या ज्योतिषशास्त्रानुसार या रंगाचे शुभ-अशुभ परिणाम

Black Dress On Sunday : हिंदू धर्म मान्यतेनुसार, सूर्याला फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. असं म्हणतात की, पहाटे सूर्यदेवाची पूजा केल्याने तसेच दर्शन घेतल्याने आपल्या शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते.

Black Dress On Sunday : आजचा दिवस रविवार (Sunday). खरंतर रविवार हा दिवस सूर्यदेवाला (Sun) समर्पित आहे. हिंदू धर्म मान्यतेनुसार, सूर्याला फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. असं म्हणतात की, पहाटे सूर्यदेवाची पूजा केल्याने तसेच दर्शन घेतल्याने आपल्या शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते. तसेच, आपल्या जीवनात यश प्राप्त होते. 

खरंतर, दररोज सूर्यदेवाला पाणी वाहणं शुभ मानले जाते. पण, ज्योतिष शास्त्रात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. यामधलाच एक म्हणजे, रविवारी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत. असं म्हणतात की, रविवारी काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. यामागे नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊयात. 

अशुभ परिणाम मिळतात

खरंतर, रविवारच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणं अशुभ मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य हा उष्ण हा आणि शुष्क असा ग्रह आहे. तर, सूर्य देव हा प्रकाश देतो आणि आपल्या आयुष्यात नवीन ऊर्जा भरतो. तर, शनी देव हा कर्मफळ दाता आहे. शनीला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी लोक काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. तसेच, मान्यतेनुसार सूर्य आणि शनी यांच्यात चांगले संबंध नाहीयेत. त्यामुळे, रविवारी काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने ग्रह दोष निर्माण होऊ शकतात. ज्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. 

2. कुंडलीतील स्थिती कमजोर असते 

सूर्याचा रंग लाल किंवा सोनेरी, तांबूस रंगाचा असतो. सूर्य हा ऊर्जेचा प्रतीक आहे. तर, शनीचा आवडता रंग काळा मानण्यात आला आहे. अशातच रविवारी काळे कपडे परिधान केल्याने सूर्य देव नाराज होतात. ज्यामुळे तुमच्या कुंडलीतील स्थिती कमजोर होऊ शकते. यामुळे व्यक्तीच्या जीवनात आत्मविश्वास कमी होतो. तसेच, तणावाची परिस्थिती उद्भवते. यामुळे या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत. 

3. राहुचा असतो प्रचंड प्रभाव

काळ्या रंगाला नकारात्मकतेचं प्रतीक देखील मानण्यात आलं आहे. तर, राहुला सुद्धा काळ्या रंगाशी जोडण्यात आलं आहे. त्यामुळे रविवारी काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने राहु ग्रहाचा प्रभाव पडतो. यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक समस्या वाढू शकतात. यासाठीच ज्योतिष शास्त्रात रविवारच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणं अशुभ आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Weekly Horoscope 17 June To 23 June 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 6 August 2026: आजचा गुरूवार 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा गुरूवार 6 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Raksha Bandhan 2026 : यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
Lucky Zodiac Signs : 6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
Lord Shiv: भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget