Astrology Shani Shukra Planet Transit 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रह (Venus) लवकरच राहूच्या नक्षत्रात संक्रमण करणार आहे. तसेच, नवीन वर्षात शुक्र शनीच्या (Shani Dev) राशीत असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला प्रेम, सौंदर्य, धन संपत्ती आणि भौतिक सुख सुविधांचा कारक ग्रह मानतात. राहू आणि शनिबरोबर शुक्र ग्रहाच्या संक्रमणामुळे अनेक राशींवर (Zodiac Signs) याचा परिणाम होणार आहे. 

Continues below advertisement


ज्योतिष शास्त्रानुसार, पहिलं नक्षत्र परिवर्तन 7 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. यामध्ये शुक्र ग्रह राहूच्या नक्षत्रात प्रवेश करणार. तर, शुक्र ग्रह जानेवारी महिन्यात मीन राशीत संक्रमण करणार आहे. 


शुक्राचं मकर राशीत संक्रमण 


मकर राशीत शुक्राच्या संक्रमणाने या राशीला अलर्ट राहण्याची गरज आहे. कारण शुक्र हा फार गंभीर ग्रह आहे. फार प्रामाणिक आहे. तसेच, या ग्रहाला कमिटमेंट्स पाळणं आवडतात. मग ते रिलेशनशिपच्या बाबतीत असो किंवा व्यवहाराच्या बाबतीत असो. जर या राशीत शुक्र ग्रह वक्री झाला तर तुम्हाला कोणताही निर्णय घेण्यात अडचण होईल. या काळात असं कोणतंही काम करु नका जे केल्याने तुम्हाला पश्चात्ताप होईल. आर्थिक स्थितीत चढ-उतार पाहायला मिळतील. 


राहूच्या नक्षत्रात शुक्राचा प्रवेश 


मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. या काळात धनलाभ होण्याचे संकेत आहेत. तसेच, तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. सिंह राशीसाठी प्रोफेशनल जीवनात चांगले संकेत मिळतील. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात. बिझनेस, शेअर मार्केट आणि रिअल इस्टेटशी संबंधित तुम्हाला लाभ मिळेल. 


शनीच्या राशीत शुक्राचं संक्रमण 


वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रहाचं मकर राशीत होणारं संक्रमण लाभदायक ठरणार आहे. या काळात उत्पन्नाची नवी साधनं तुमच्यासमोर असतील. शनी-शुक्राच्या युतीने तुमचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुम्ही नवीन प्रोजेक्टवर काम सुरु करु शकता. समाजात नवीन ओळखी निर्माण होतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :                                               


Numerology 2026 Prediction : नवीन वर्षात 'या' जन्मतारखेच्या लोकांचे डोळे खडकन् उघडणार; नशिबाची साथ की साडेसाती लागणार? वाचा 2026 अंकशास्त्र