Numerology 2026 Prediction : नवीन वर्ष 2026 सुरु व्हायला अवघे दोनच महिने शिल्लक आहे. नवीन वर्ष म्हटल्यानंतर नवीन आशा, नवी उमेद आणि नवी स्वप्न. आपल्यापैकी प्रत्येकजण नवीन वर्षाचं (New Year 2026) स्वागत याच गोष्टी ध्यानात ठेवून घेतो. पण, ज्योतिष शास्त्राप्रमाणेच अंकशास्त्राच्या (Ank Shastra) दृष्टीने देखील नवीन वर्षाची काही मूल्य, धोरणं आहेत. याच्या आधारे 2026 हे वर्ष नेमकं कसं जाणार आहे याचा अंदाज लावता येतो. 

Continues below advertisement

ज्योतिष शास्त्रानुसार, 2026 चा अधिपती अंक 1 आहे. हा अंक सूर्याचा मानला जातो. सूर्य ग्रहाला आत्मविश्वास, नेतृत्व आणि नवीन सुरुवातीचा प्रतीक मानला जातो. त्यानुसार, तुमच्या जन्मतारखेनुसार मूलांक 1 ते 9 साठी नवीन वर्ष नेमकं कसं असेल ते जाणून घेऊयात. 

मूलांक 1 (जन्मतारीख - 1, 10, 19 आणि 28)

नवीन वर्ष तुमच्यासाठी तुमची ओळख निर्माण करण्याचं आणि प्रगतीचं वर्ष असणार आहे. 

Continues below advertisement

करिअर - तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. एखादी चांगली संधी तुम्हाला मिळेल. 

धन - तुमच्या धनसंपत्तीत चांगली स्थिरता येईल. पण, खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. 

लव्ह लाईफ - तुमच्या नात्यात रोमान्स टिकून राहील. 

आरोग्य - जास्त काम केल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घ्या. 

उपाय - दर रविवारी सूर्याला जल अर्पण करा.

शुभ अंक - 1

शुभ रंग - सोनेरी 

मूलांक 2 (जन्मतारीख - 2, 11, 20 आणि 29) 

नवीन वर्ष तुमच्यासाठी भावनिक असेल. तुम्हाला पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात स्थिरता येणं गरजेचं आहे. 

करिअर - तुमच्या व्यवसायात हळुहळू प्रगती होईल. रचनात्मक कामातून तुम्हाला संतुलन साधावं लागेल. 

संपत्ती - तुमचं उत्पन्न वाढेल. पण, भावनेच्या भरात व्यवहार करु नका. 

लव्ह लाईफ - जोडीदाराबरोबर चांगले संबंध निर्माण होतील. अविवाहितांसाठी शुभ योग आहेत. 

आरोग्य - मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करा. ध्यान किंवा संगीताने मन शांत राहील. 

उपाय - सोमवारी दूध किंवा तांदूळ दान करा. 

शुभ अंक - 2

शुभ रंग - पांढरा

मूलांक 3 (जन्मतारीख - 3, 12, 21 आणि 30)

हे नवीन वर्ष तुमच्यासाठी जबाबदारीचं आणि प्रगतीचं वर्ष असणार आहे. 

करिअर - कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. 

संपत्ती - तुमच्या उत्पन्नात वाढ झालेली दिसेल. प्रवासाच्या निमित्ताने पैसे खर्च होऊ शकतात. 

लव्ह लाईफ - पार्टनरबरोबर समजुतदारीने वागाल. वाद-विवाद मिटतील. 

आरोग्य - पोट आणि झोपेशी संबंधित समस्या तुम्हाला जाणवू शकतात. 

उपाय - पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणं शुभ ठरेल. 

शुभ अंक - 3

शुभ रंग - पिवळा किंवा नारिंगी 

मूलांक 4 (जन्मतारीख - 4, 13, 22 आणि 31)

आयुष्यातील प्रत्येक वळणावर नवीन गोष्टी शिकता येतील. घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. 

करिअर - तुमच्या जीवनात प्रत्यक्षपण चांगल्या गोष्टी घडतील. 

संपत्ती - अनपेक्षितपणे तुमच्या खर्चात वाढ झालेली दिसेल. पण, महिन्याच्या शेवटी बॅंक बॅलेन्स वाढेल. 

लव्ह लाईफ - नात्यात चढ-उतार निर्माण होतील. 

आरोग्य - कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण घेऊ नका. नियमित योग करा. 

उपाय - शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. 

शुभ अंक - 4

शुभ रंग - निळा किंवा राखाडी

मूलांक 5 (जन्मतारीख 5, 14 आणि 23) 

नवीन वर्षात करिअरच्या नवीन वाटा तुमच्यासाठी निर्माण होतील. नवीन संधी मिळतील. 

करिअर - नोकरी बदलायची असेल किंवा एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची सुवर्णसंधी मिळेल.

संपत्ती - उत्पन्नाची साधनं तुमच्यासमोर उपलब्ध होतील. गुंतवणूक विचारपूर्वक करा. 

लव्ह लाईफ - प्रेमात अनेक चढ-उतार येतील. नात्यात संवाद ठेवा. 

आरोग्य - खाण्या-पिण्यावर लक्ष ठेवा. पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. 

उपाय - हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा. तसेच, बुधवारी हिरवे मूग दान करा. 

शुभ अंक - 5

शुभ रंग - हिरवा

मूलांक 6 (जन्मतारीख - 6, 15 आणि 24)

नवीन वर्ष तुमच्यासाठी चांगलं असेल. प्रेम, समृद्धी आणि जबाबदारीचं हे वर्ष असणार आहे. 

करिअर - कला, मिडिया, फॅशनशी संबंधित लोकांना लाभ मिळेल. 

संपत्ती - उत्पन्न वाढेल पण त्याचबरोबर तुमच्या खर्चातही वाढ होईल. 

लव्ह लाईफ - तुमच्या नात्यात गोडवा निर्माण होईल. विवाहासाठी अनेक शुभ मुहूर्त आहेत. 

आरोग्य - गोड पदार्थांपासून दूर राहा. वजन नियंत्रित ठेवा. 

उपाय - शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करा. 

शुभ अंक - 6

शुभ रंग - गुलाबी 

मूलांक 7 (जन्मतारीख - 7, 16 आणि 25) 

नवीन वर्ष तुमच्यासाठी तुमचं प्रतिबिंब दाखवणारा असेल. या काळात तुम्हाला आत्मभान जाणवेल. 

करिअर - तुमची हळुहळू प्रगती होईल. संशोधन किंवा टेक्निकल क्षेत्रात तुम्हाला लाभ मिळेल. 

संपत्ती - अप्रात्यक्षिक तुम्हाला धनलाभ होईल. पैशांची गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा.

लव्ह लाईफ - तुमच्या पार्टनरबरोबर मनमोकळेपणाने संवाद साधा. 

आरोग्य - पुरेशी झोप घ्या. तसेच, काळजी करु नका. 

उपाय - शनिवारच्या दिवशी भगवान विष्णू किंवा शनि मंदिरात जा. 

शुभ अंक - 7

शुभ रंग - आकाशी 

मूलांक 8 (जन्मतारीख - 8, 17 आणि 26) 

तुम्ही मागच्या वर्षात केलेल्या कर्माचं तुम्हाला पळ मिळेल. कामात स्थिरता 

करिअर - तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. 

संपत्ती - दीर्घकालीन गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळेल. 

लव्ह लाईफ - नात्यात जबाबदाऱीमुळे दुरावा निर्माण होऊ शकतो. 

आरोग्य - थकवा आणि तणापासून दूर राहा. 

उपाय - शनिवारच्या दिवशी काळ्या रंगाचे तीळ अर्पण करा. 

शुभ अंक - 8

शुभ रंग - काळा 

मूलांक 9 ( जन्मतारीख - 9, 18 आणि 27)

नवीन वर्ष तुमच्यासाठी उत्साहाचं, ऊर्जेचं असेल. 

करिअर - साहसी निर्णयातून तुम्हाला यश मिळेल. 

संपत्ती - तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. घाईगडबडीत कोणताही निर्णय 

लव्ह लाईफ - नात्यात आदर गरजेचा आहे. रागावर नियंत्रण ठेवा. 

आरोग्य - कोणत्याही प्रकारच्या अपघातापासून दूरच राहा. संयम गरजेचा आहे. 

उपाय - मंगळवारी हनुमान चालीसाचं पठण करा. तसेच, लाल फूल चढवा. 

शुभ अंक - 9

शुभ रंग - लाल

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Shani Margi 2025 : शनीची लवकरच मार्गी चाल! 2026 पर्यंत 'या' राशी जगतील 'टेन्शन फ्री'; संकटातून होणार सुटका, शनिदेवाची कृपा