Astrology Panchang Yog 24 March 2025 : आज 24 मार्च म्हणजेच आठवड्याचा पहिला दिवस सोमवार. आजचा दिवस भगवान शंकराला (Lord Shiva) समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी अष्टमी तिथी असल्याने आजचा दिवस खास आहे. तसेच, आज चंद्राची स्थिती देखील समान असल्या कारणाने गजकेसरी योग (Yog) जुळून आला आहे. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने पाहिल्यास, लवकरच शनीचा मीन राशीत प्रवेश होणार आहे. त्यामुळे इतर राशींसाठी (Zodiac Signs) हे संक्रमण फार महत्त्वाचं असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ कोणत्या 3 राशींना मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. आज तुमचा दिवस सकारात्मक जाईल. तुम्ही नियोजित केलेली सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. तसेच, तुमच्य कामात कोणत्याच प्रकारचा अडथळा येणार नाही. ग्रहांची स्थिती चांगली असल्या कारणाने तुम्हाा चिंता करण्याची गरज नाही. फक्त खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडत असल्यास त्याचा विरोध करु नका. किंवा विनाकारण त्रागा करु नका. यामुळे तुमचंच नुकसान होईल. त्याचप्रमाणे तुम्ही केलेल्या तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला मिळेलच. त्यामुळे चिंता करु नका. देवाचं नामस्मरण करत राहा.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. दिवसभर तु्म्ही उत्साही असाल. तसेच, तुमची निर्णय घेण्याची क्षमता फार चांगली असल्या कारणाने तुमच्यासाठी हा एक चांगला लाभ मानला जाणार आहे. निर्णयक्षमता चांगली असल्या कारणाने तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसेल. मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा चालना मिळेल. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: