Horoscope Today 24 March 2025: पंचांगानुसार, आज 24 मार्च 2025, म्हणजेच आजचा वार सोमवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


मेष राशीच्या लोकांनो आज सर्व कामे धाडसाने करणार आहात, आपलं ते खरं करून चालल्यामुळे कुटुंबीयांशी थोडी मतभेद संभवतात 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


वृषभ राशीच्या लोकांनो आपली मतं दुसऱ्यावर लागण्याचा प्रयत्न कराल लहरी आणि आग्रही वृत्तीमुळे सर्व क्षेत्रांमध्ये खळबळ माजवून टाकाल 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


मिथुन राशीच्या लोकांनो आज मानसिक शांतता स्वास्थ्य भंग पावण्याची शक्यता आहे, वैवाहिक सौख्यामध्ये मात्र मनासारखे दान पडेल 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


कर्क राशीच्या लोकांनो आईच्या तब्येतीला जपावे लागेल, महिलांनी वादविवाद न करता सामंजस्याचे धोरण ठेवावे 


सिंह रास (Leo Horoscope Today)


सिंह राशीच्या लोकांनो आज काही निर्णय व्यवहाराच्या कठीण पाषाणावर उभे राहून घ्यावे लागतील 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


कन्या राशीच्या लोकांनो आज बौद्धिकतेची साथ उत्तम मिळून, तुमच्यापुढे येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला धडाडीने सामोरे जाल 


तूळ रास (Libra Horoscope Today)


तूळ राशीच्या लोकांनो मनाचा समतोल उत्तम राखून, बरोबरच्या मित्र-मैत्रिणींचे उत्तम सहकार्य लाभेल


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


वृश्चिक राशीच्या लोकांनो नोकरी व्यवसायात खोलवर विचार करून चिकाटीने कामे पूर्ण कराल 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


धनु राशीच्या लोकांनो कंटाळा हा शब्द तुमच्या कशात नसेल, आर्थिक स्थिती उत्तम राहिली तरी जवळच्या पैशाला अनेक वाटा फुटतील 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


मकर राशीच्या लोकांनो नवीन जबाबदाऱ्या कुशलतेने कराल आणि काहीतरी भरीव कार्य करून दाखवाल 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


कुंभ राशीच्या लोकांनो महिलांनो जीभेवर नियंत्रण ठेवा, भांडणे उकरून काढण्याचे टाळावे लागेल 


मीन रास (Pisces Horoscope Today)


मीन राशीच्या लोकांनो नोकरी व्यवसायातील अडकलेली कामे मार्गी लागतील, हाताखालच्या नोकरांचे उत्तम सहकार्य  लाभेल.


हेही वाचा>>


Gudi Padwa 2025 Rajyog: गुढीपाडव्याला बनतोय जबरदस्त राजयोग! 'या' 6 राशींचा 'गोल्डन टाईम' सुरू होतोय, राजासारखं जीवन जगणार, बक्कळ पैसा, नोकरीत यश..


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)