Horoscope Today 24 March 2025 : आज 24 मार्चचा दिवस आहे. म्हणजेच आजचा दिवस सोमवार. भगवान शंकराचा वार असल्या कारणाने आजचा दिवस खास असणरा आहे. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाचा काळ देखील जवळ आला आहे. त्यामुळे प्रत्येक राशींत काहीना काही बदल झालेले पाहायला मिळतायत. त्यानुसार, आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यासाठी जाणून घेऊयात आजचे राशीभविष्य (Horoscope Today). 

मेष रास (Aries) 

करिअर : कामात नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या.

आर्थिक स्थिती : खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक गुंतवणूक टाळा.

प्रेम व नातेसंबंध : प्रियजनांसोबत वेळ घालवा. गैरसमज टाळा.

आरोग्य : मानसिक थकवा जाणवेल. ध्यान करा.

शुभ उपाय : श्री हनुमान चालीसा पठण करा.

वृषभ रास (Taurus) 

करिअर : कामात समाधान मिळेल. नोकरीत नवीन संधी मिळण्याची शक्यता.

आर्थिक स्थिती : धनलाभ संभवतो. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमसंबंधात सकारात्मकता राहील. विवाहयोग संभवतो.

आरोग्य : पचनाच्या तक्रारी संभवतात. सात्त्विक आहार घ्या.

शुभ उपाय : तुळशीला पाणी अर्पण करा.

मिथुन रास (Gemini) 

करिअर : नवीन कल्पनांचा स्वीकार करा. व्यवसायासाठी उत्तम दिवस.

आर्थिक स्थिती : अनपेक्षित धनलाभ होईल. नवीन प्रोजेक्ट फायदेशीर ठरेल.

प्रेम व नातेसंबंध : जुने मित्र भेटतील. कुटुंबासोबत वेळ घालवा.

आरोग्य : थकवा जाणवेल, परंतु गंभीर समस्या नाही.

शुभ उपाय : गणपतीला दूर्वा अर्पण करा.

कर्क रास (Cancer) 

करिअर : संयम ठेवा. मोठे निर्णय पुढे ढकला.

आर्थिक स्थिती : खर्च वाढण्याची शक्यता. सावधगिरीने पाऊल टाका.

प्रेम व नातेसंबंध : जोडीदारासोबत वाद निर्माण होऊ शकतो. शांत राहा.

आरोग्य : भावनिक तणाव जाणवेल. सकारात्मक विचार ठेवा.

शुभ उपाय : चंद्रदेवाची उपासना करा.

सिंह रास (Leo) 

करिअर : अधिकार वाढण्याची शक्यता. महत्त्वाचे निर्णय तुमच्या बाजूने जातील.

आर्थिक स्थिती : आर्थिक प्रगती होईल. नवी गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

प्रेम व नातेसंबंध : जोडीदाराच्या मतांचा आदर करा. प्रेमसंबंधात गोडवा राहील.

आरोग्य : लहानशा दुखापतीपासून सावध रहा.

शुभ उपाय : सूर्याला जल अर्पण करा.

कन्या रास (Virgo) 

करिअर : कामात अडथळे येतील, पण संयम ठेवा. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

आर्थिक स्थिती : खर्च वाढू शकतो. आर्थिक नियोजन करा.

प्रेम व नातेसंबंध : जोडीदाराच्या भावना समजून घ्या. घरात आनंद राहील.

आरोग्य : रक्तदाबाशी संबंधित समस्या संभवतात. काळजी घ्या.

शुभ उपाय : देवी महालक्ष्मीची उपासना करा.

तूळ रास (Libra) 

करिअर : नवीन प्रकल्प हाती घ्या. यश मिळण्याची शक्यता.

आर्थिक स्थिती : पैशाच्या बाबतीत सतर्क राहा. सावधगिरीने खर्च करा.

प्रेम व नातेसंबंध : जोडीदारासोबत वेळ घालवा. गैरसमज दूर होतील.

आरोग्य : मानसिक तणाव जाणवेल. शांत राहा.

शुभ उपाय : शुक्रदेवाची उपासना करा.

वृश्चिक रास (Scorpio) 

करिअर : जबाबदाऱ्या वाढतील. नवे काम स्वीकारताना विचार करा.

आर्थिक स्थिती : मोठ्या गुंतवणुकीसाठी वेळ चांगला नाही.

प्रेम व नातेसंबंध : जोडीदारासोबत आनंदी वेळ जाईल.

आरोग्य : सर्दी-खोकला होण्याची शक्यता. काळजी घ्या.

शुभ उपाय : हनुमान चालीसा पठण करा.

धनु रास (Sagittarius) 

करिअर: नवीन कामात यश मिळेल. मेहनतीला फळ मिळेल.

आर्थिक स्थिती : आर्थिक लाभ होईल. नवीन संधी मिळतील.

प्रेम व नातेसंबंध : मित्रांशी संवाद वाढवा. सकारात्मक परिणाम दिसतील.

आरोग्य : संधिवात किंवा सांधेदुखीची समस्या संभवते.

शुभ उपाय : गुरुवारचा उपवास ठेवा.

मकर रास (Capricorn) 

करिअर : जबाबदाऱ्या वाढतील. कामाची प्रशंसा होईल.

आर्थिक स्थिती : अचानक धनलाभ होण्याची शक्यता.

प्रेम व नातेसंबंध : प्रेमसंबंध बहरतील. नवा प्रस्ताव मिळण्याची शक्यता.

आरोग्य : तणावामुळे डोकेदुखी संभवते.

शुभ उपाय : शनिदेवाची उपासना करा.

कुंभ रास (Aquarius) 

करिअर : नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. संयम ठेवा.

आर्थिक स्थिती : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

प्रेम व नातेसंबंध : कुटुंबासोबत वेळ घालवा. नवे मित्र जोडाल.

आरोग्य : थकवा जाणवेल, विश्रांती घ्या.

शुभ उपाय : भगवान शिवाची पूजा करा.

मीन रास (Pisces) 

करिअर : कामात पुढे जाण्याच्या संधी मिळतील.

आर्थिक स्थिती : नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होतील.

प्रेम व नातेसंबंध : जोडीदारासोबत प्रवासाची शक्यता.

आरोग्य : थोडी अशक्तता जाणवेल. पौष्टिक आहार घ्या.

शुभ उपाय : विष्णूसहस्रनाम पठण करा.

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हे ही वाचा :

Shani Dev 2025 : एप्रिल महिन्यात 'या' 3 राशींची होणार चांदी! शनीचा मीन राशीत होतोय उदय, मिळणार बक्कळ पैसा, यश पदरात पडणार