Astrology Panchang Yog 19 March 2025 : आज 19 मार्च म्हणजेच बुधवारचा दिवस. आजच्या दिवशी ग्रहांचा राजा सूर्यासह बुध ग्रह मिळून बुधादित्य योग जुळून येणार आहे. त्याचबरोबर, चंद्राचं संक्रमण वृश्चिक राशीत होणार आहे. यामुळे गजकेसरी योगाचा (Yog) शुभ संयोग जुळून येणार आहे. आज जुळून आलेला शुभ योग 5 राशींसाठी फार शुभ ठरणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज तुम्हाला अनेक स्त्रोतांमधून अचानक धनलाभ मिळू शकतो. तसेच, ऑफिसमध्ये देखील तुमचं काम अगदी सुरळीत सुरु राहणार आहे. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. सरकारी कामे पूर्ण करण्यासाठी थोडा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची इच्छा होईल. तसेच, ज्याची कधी अपेक्षाही केली नसेल अशा गोष्टी तुमच्याबरोबर घडण्याची शक्यता आहे. भाग्याची पूर्ण साथ तुमच्याबरोबर आहे. तसेच, तुमच्या मनातील इच्छाही पूर्ण होईल. परदेशातील संबंधित कामाच्या बाबतीत तुम्हाला एखादी मोठी डील मिळू शकते. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. अर्थात तुम्हाला मेहनत देखील करावी लागेल. सामजिक कार्याशी संबंधित तुम्ही फार अग्रेसर असाल. मॅनेजमेंटशी संबंधित लोकांना आज चांगला लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा चांगला सपोर्ट तुम्हाला मिळेल. तसेच, भौतिक सुख सुविधांचा लाभ तुम्ही घेऊ शकाल. बिझनेस करणाऱ्या लोकांना संयमाने वागावं लागेल. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, त्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. कुटुंबियांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तसेच, जे तरुण नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू देखील मिळू शकते. नोकरीतील सर्व समस्या दूर होतील. तसेच, आज तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. 


हे ही वाचा :


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


Horoscope Today 19 March 2025: आजचा बुधवार खास! 12 राशींसाठी दिवस कसा असेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा..