Astrology Panchang Yog 15 March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 15 मार्च म्हणजेच शनिवारचा दिवस आहे. आज सूर्य, बुध आणि शुक्र ग्रह मीन राशीत विराजमान आहेत. त्यामुळे बुधादित्य योग (Yog) जुळून आला आहे. तसेच, आज कृष्ण पक्ष प्रतिपदा तिथी आहे त्याचबरोबर चंद्राधि योग आणि हस्त नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक परिणाम घेऊन येणारा असणार आहे. आज तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, तुम्ही आखलेल्या योजना यशस्वीरित्या पूर्ण होतील. तुमची आर्थिक स्थिती देखील पूर्वीपेक्षा चांगली असेल. तसेच, धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या लाभदायक असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या वाणीवर तुमचं चांगलं प्रभुत्व असेल. तसेच, तुमचा व्यवसाय चांगला जोमाने सुरु राहील. घरच्यांचाय तुम्हाला पाठिंबा मिळेल. फक्त आजच्या दिवशी कोणाशीही मतभेद करु नका. अन्यथा त्याचा तुमच्या कामावर परिणाम दिसून येईल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आत तुमच्यात भरपूर आत्मविश्वास असेल. याच्याच जोरावर तुम्ही आज अनेक महत्त्वाचे निर्णय घ्याल. मात्र, त्यात तुम्ही कुटुंबियांना सामाविष्ट करुन घ्याल. तुमच्या कुटुंबात आज आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेचा चांगला विकास होईल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज सकाळपासून तुमचा दिवस प्रसन्नतेचा असणार आहे. तसेच, तुमचं थांबलेलं प्रमोशन तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील. तसेच, देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद असल्या कारणाने तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली असणार आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना आर्थिक लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची चांगली पोचपावती तुम्हाला मिळेल. त्यामुळे लवकरच प्रमोशन होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: