Chhaava Box Office Collection Day 29: विक्की कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा' चित्रपटानं (Chhaava Movie) आज होळीच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) विक्रम रचलाय. येत्या काळातील आगामी चित्रपटांना 'छावा'ची (Chhaava Movie) बरोबरी करण्यासाठी किंवा 'छावा'ला पछाडण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागू शकते. आगामी चित्रपटांवर नजर टाकली तर, सलमान खानच्या 'सिकंदर' (Sikandar Movie) व्यतिरिक्त, इतर कोणत्याही चित्रपटात विक्रमाची बरोबरी करण्याची ताकद दिसत नाही. 


छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) पुत्र छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं प्रदर्शित झाला. तेव्हापासून, चित्रपटानं दररोज एकामागून एक रेकॉर्ड रचले आहेत, पण चित्रपटानं आज बनवलेला रेकॉर्ड काहीसा खास आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन 29 दिवस उलटले आहेत, अशातच आज चित्रपटानं किती कमाई केली? आजपर्यंतचं चित्रपटाचं एकूण कलेक्शन किती? आणि चित्रपटानं कोणते रेकॉर्ड रचले आहेत? सविस्तर पाहुयात...


'छावा' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती? 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑफिशिअल आकडेवारीवर एक नजर टाकली तर, फिल्मनं दर आठवड्याला हिंदीतून किती कमाई केली? जाणून घेऊयात संपूर्ण आकडेवारी... 



  • पहिला आठवडा : 225.28 कोटी

  • दुसरा आठवडा : 186.18 कोटी

  • तिसरा आठवडा : 84.94 कोटी

  • चौथा आठवडा : 43.98 कोटी


एकूण हिंदी कलेक्शन : 540.38 कोटी




याव्यतिरिक्त, फिल्मनं तेलुगुमधून गेल्या आठवड्यातील शुक्रवारपासून या आठवड्यातील शुक्रवारपर्यंत म्हणजेच, 7 दिवसांत 2.63 कोटी, 3.31 कोटी, 2.22 कोटी, 1.24 कोटी, 0.95 कोटी, 0.70 कोटी आणि 0.75 कोटींची कमाई करत एकूण 11.80 कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच, 'छावा' नं हिंदी आणि तेलुगुमध्ये एकत्रितरित्या 4 आठवड्यांत एकूण 552.18 कोटी रुपये जमा केले आहेत. 


'छावा' चित्रपटाचं 29व्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन


'छावा'नं 29 व्या दिवशी म्हणजेच, आज होळीच्या दिवशी रात्री 10:30 वाजेपर्यंत 7.25 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचं एकूण कलेक्शन 559.43 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. आजचा डेटा SACLINK नुसार आहे आणि अंतिम नाही. यामध्ये बदल होऊ शकतात.


होळीला 'छावा'नं कोणता खास विक्रम केला?


'छवा'नं आज रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' (553.87 कोटी रुपये) चा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडला आणि सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या टॉप 3 यादीत स्थान मिळवलं आहे. या पलीकडे फक्त दोनच चित्रपट आहेत. या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर 'जवान' आहे, ज्यानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 640.25 कोटी रुपये कमावले. तर स्त्री 2 दुसऱ्या स्थानावर आहे, ज्यानं 597.99 कोटी रुपये कमावले.


दरम्यान, 'छावा'बद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. या चित्रपटात आशुतोष राणाच्या भूमिकेत विक्की कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना आणि विनीत कुमार सिंह यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट सुमारे 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


छावाची हवा! आता फक्त 2 चित्रपट राहिले, बाकी सर्वांचे रेकॉर्ड ब्रेक; कमाईचा नवा डोंगर केला सर!