एक्स्प्लोर

Astrology : हनुमान जयंतीला जुळून आला 'पंचग्रही योग'; वृषभसह 'या' 5 राशींवर असणार बजरंगबलीचा आशीर्वाद, मागाल ती इच्छा होईल पूर्ण

Astrology Panchang Yog 12 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Astrology Panchang Yog 12 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस शनिवार म्हणजेच शनीदेवाचा (Shani Dev) वार आहे. पण, त्याचबरोबर आजचा दिवस आणखी खास आहे. याचं कारण म्हणजे आज आपल्या लाडक्या बजरंगबलीची म्हणजेच भगवान हनुमानाची जयंती (Hanuman Jayanti) आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. त्याचबरोबर आज पाच ग्रहांचा दुर्लभ संयोग (Yog) जुळून आला आहे. यामध्ये शनी, बुध, शुक्र, राहू आणि सूर्य ग्रहांचा देखील समावेश आहे. त्यामुळे आजच्या दिवशी पंचग्रही योग जुळून आला आहे. यासाठीच आज काही राशींना चांगलाच लाभ मिळणार आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांवर बजरंगबलीची कृपा असणार आहे. या राशीच्या लोकांना हाती घेतलेल्या कामात चांगलं यश मिळेल. तसेच, तुम्ही गुंतवणूक केलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. आज तुम्ही काही नवीन जबाबादाऱ्या अंगावर घेऊ शकता. यातून तुम्हाला चांगलं शिकायला मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी प्रसन्न वातावरण पाहायला मिळेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवहाराच्या दृष्टीने चांगला असणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला लाभ मिळेल. नवीन ऑर्डर्स येत राहतील. त्यामुळे तुम्ही विकेंडच्या दिवशी फार व्यस्त असाल. तसेच, जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगल्या नोकऱ्या मिळतील. मात्र, मेहनतीला पर्याय नाही. हे लक्षात ठेवा. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. जुने वादविवाद मिटतील. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. त्यामुळे चिंता करु नका. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज सकाळपासूनच तुम्ही फार प्रसन्न असाल. तसेच, कामाच्या ठिकाणी देखील चांगलं आणि सकारात्मक वातावरण अनुभवायला मिळेल. मुलांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमच्या कलात्मकतेला चांगला वाव मिळेल. नवीन गोष्टी शिकण्याची तुमची जिद्द आणि इच्छा दिसून येईल. पंचग्रही योगाचा चांगला लाभ मिळेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. आज भगवान हनुमानाची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. तसेच, थोरामोठ्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. इतकंच नव्हे तर तुमच्या विरोधकांना देखील चांगलाच धडा मिळणार आहे. त्यामुळे चिंता करु नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 12 April 2025 : हनुमान जयंतीच्या दिवशी 'या' 3 राशींवर असणार बजरंगबलीची कृपा; वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 March 2026: आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! भोलेनाथांची मोठी कृपा, समस्यांचा अंत, विघ्न टळणार, आजचे राशीभविष्य
आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! भोलेनाथांची मोठी कृपा, समस्यांचा अंत, विघ्न टळणार, आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 16 मार्चचा दिवस ठरणार गेमचेंजर! भगवान शंकराच्या कृपेने संपत्तीत होईल भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
16 मार्चचा दिवस ठरणार गेमचेंजर! भगवान शंकराच्या कृपेने संपत्तीत होईल भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशींनो...मार्चचा तिसऱ्या आठवड्यात करिअर जोरात, उत्तम संधी चालून येईल, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशींनो...मार्चचा तिसऱ्या आठवड्यात करिअर जोरात, उत्तम संधी चालून येईल, साप्ताहिक राशीभविष्य
Numerology : मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात 'या' जन्मतारखेच्या लोकांची होणार भरभराट; नोकरीत बॉसकडून मिळतील प्रमोशनचे संकेत
मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात 'या' जन्मतारखेच्या लोकांची होणार भरभराट; नोकरीत बॉसकडून मिळतील प्रमोशनचे संकेत

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget