Astrology Panchang Yog 11 August 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज 10 ऑगस्ट 2025 चा दिवस आहे. आजचा दिवस हा तिसरा श्रावणी सोमवार असून भगवान शंकराला समर्पित आहे. तसेच, आज चंद्र कुंभ राशीत भ्रमण करत आहे. तसेच, आज बुध देखील मार्गी असून सूर्यासोबत मिळून बुधादित्य योगाचा शुभ संयोग निर्माण करत आहे. आजच्या दिवशी गजलक्ष्मी योगासह बुधादित्य योगदेखील जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस फार लकी असणार आहे. नोकरीत तुमची स्थिती चांगली पाहायला मिळेल. तसेच, फॅमिली बिझनेसशी संबंधित तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुमच्या कामाची किर्ती दूरवर पसरेल. त्याचबरोबर. तुम्ही प्रॉपर्टीमध्ये देखील चांगली गुंतवणूक करु शकता. आज तुम्हाला धनलाभ होईल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस भाग्यवान राहणार आहे. आज नशीब तुमच्यावर कृपा करणार आहे. तुमचे अडकलेले काम गती घेईल. जर तुमचे पैसे बाजारात कुठेतरी अडकले असतील तर ते परत मिळू शकेल. यामुळे तुम्हाला सुटकेचा नि:श्वास मिळेल. व्यवसायाच्या संदर्भात लांब पल्ल्याच्या प्रवासाला जाऊ शकता. तुमच्यासाठी प्रवास आनंददायी आणि यशस्वी होईल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. करिअरमध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना उच्च अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन आणि प्रशंसा दोन्ही मिळेल. इच्छित काम मिळू शकेल जे तुम्ही अधिक उत्साहाने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. यासोबतच,चांगली बातमी ऐकायला मिळू शकेल. व्यवसायात अपेक्षित सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचे काम योग्य गतीने पुढे जाईल
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा सोमवार अपेक्षेपेक्षा चांगला जाणार आहे. व्यवसायात सकारात्मक परिणाम मिळतील. तुमच्या विवेकबुद्धीच्या बळावर तुम्ही अनुकूल वातावरण निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. स्पर्धेला सामोरे जावे लागेल पण तुमच्या बळावर तुम्ही तुमच्या स्पर्धकांपेक्षा पुढे जाल. गांभीर्याने काम करण्याची तुमची सवय तुम्हाला इतरांपासून वेगळे करेल. लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमच्या कामाला एक नवीन ओळख देखील मिळू शकते
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. व्यवसाय आणि करिअरमध्ये धाडसी निर्णयांचा फायदा होईल. तुम्ही तुमच्या विचारसरणीने आणि निर्णयांनी इतरांपेक्षा दोन पावले पुढे असाल. तुमच्या व्यवसायाला एक नवीन रूप देऊ शकता. आज तुम्ही तुमच्या वक्तृत्वाने दुसऱ्या व्यक्तीला प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाची झलक वेगळ्या पद्धतीने दिसेल
हेही वाचा :
Horoscope Today 11 August 2025: आजचा श्रावणी सोमवार 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! भगवान शंकर असतील पाठीराखा, आजचे राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)