India Biggest Box Office Flop Movie: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) दररोज म्हटलं तरी अनेक सिनेमे रिलीज होत असतात. त्यातले काही गाजतात तर काही सुपरफ्लॉप ठरतात. सध्या तर ओटीटीमुळे (OTT Movie) कित्येक नवे सिनेमे येतात, पण सगळेच चर्चेत राहतात असं नाही... आज आम्ही अशाच एका बॉलिवूड सिनेमाबाबत (Bollywood Movie) सांगणार आहोत, ज्याची बजेट तर आभाळाएवढं होतं, पण त्या सिनेमानं केलेली कमाई मातीच्या कणाएवढीही नव्हती. कोट्यवधींच्या भांडवलात हा चित्रपट तयार झाला आणि रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर (Box Office) मात्र जोरात आदळला. ही फिल्म तयार होण्यासाठी तब्बल 45 कोटींचं भांडवलं लागलं होतं. हा सिनेमा निर्माते, दिग्दर्शकाना घेऊन खड्ड्यात गेलाच, पण या सिनेमामुळे इंडस्ट्रीला तब्बल 99.99 टक्क्यांचं नुकसान झालं होतं. कारण, कमाई फक्त 60 हजार रुपयांची केली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, या चित्रपटात अर्जून कपूर (Arjun Kapoor) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हे दोन स्टार्स झळकले होते.
सिनेमाची 500 तिकिटही विकली गेली नाहीत...
आजवरचा सर्वात मोठा फ्लॉप ठरलेला हा सिनेमा क्राईम-थ्रीलर जॉनरचा होता. हा सिनेमा भूषण कुमार यांच्या टी-सीरीज बॅनर अंडर बनवण्यात आला होता. असं सांगितलं जात आहे की, 2023 मध्ये या फिल्मची दुसऱ्यांदा शुटिंग झाल्यामुळे याचं बजेट वाढलं होतं. पण, नशीब एवढं खराब होतं की, रिलीजनंतर या फिल्मला कुणी डिस्ट्रीब्युटर मिळालाच नाही. पहिल्या दिवशी भारतात फक्त 293 तिकीटं विकली गेली होती. याचं लाईफटाईम कलेक्शन 1 लाख रुपयांपेक्षाही कमी होतं.
अर्धवट फिल्म केलेली रिलीज
अर्जून कपूर आणि भूमी पेडणेकर स्टारर फिल्म प्लॉप होण्यासाठी कारण सांगितलं जातं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, The Lady Killer अपूर्णच रिलीज झाली होती. याचा क्लायमॅक्सही पूर्ण शूट केला नव्हता. दिग्दर्शकांनी सुरुवातीला ही गोष्ट मान्य केली होती. पण, नंतर मात्र अपूर्ण फिल्म रिलीज केल्याचं अमान्य केलं होतं. असंही म्हटलं जातं की, फिल्मला फक्त एक टोकन रिलीज मिळाली होती. मेकर्सनी डिसेंबर 2024 मध्ये याच्या स्ट्रिमिंगसाठी नेटफ्लिक्ससोबत डीलही केली होती. पण, यासाठी त्यांना फिल्मला नोव्हेंबर 2023 मध्ये रिलीज करायचं होतं. कारण जर असं केलं नसतं, तर डील अमान्य झाली असती. याच कारणानं त्यांनी अपूर्ण राहिलेली फिल्म रिलीज करून टाकली होती.
कुठे पाहु शकता 'द लेडी किलर'?
फिल्मचं प्रमोशनही केलं नाही. ट्रेलर रिलीजसाठी एक इव्हेंट पार पडला होता, पण त्यानंतर अॅक्टर्सनी याचं कोणतंही प्रमोशन केलं नाही. त्यानंतर मूव्ही रिलीज झाल्यानंतर याचा परफॉर्मन्स एकदम खराब होता. तिकीटं विकणं बंद झालेली. नंतर तर, स्ट्रीमिंग रिलीजही कॅन्सल केली होती. कारण, नेटफ्लिक्सनंही फिल्मचा रिस्पॉन्स पाहून एक पाऊल मागे टाकण्यास सुरुवात केली होती. 'द लेडी किलर'ला सप्टेंबर 2024 मध्ये टी-सीरीजसाठी YouTube चॅनलवर मोफत रिलीज करण्यात आलं. YouTube वर ही फिल्म 3.5 मिलियन वेळा पाहिली गेली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :