Horoscope Today 11 August 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 11 ऑगस्ट 2025, आजचा वार सोमवार आहे. आजचा तिसरा श्रावणी सोमवार हा सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे.या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज एरवी व्यवहाराने वागणारे तुम्ही, परंतु आज मात्र व्यवहाराशी फारकत होईल, कोणी तुम्हाला फसवणार नाही याची काळजी घ्यावी.  

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज अति भावना प्रधानतेमुळे तोटा सहन करावा लागेल पैशाचा अति लोभ नुकसान करेल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज वास्तवाशी सांगड घालताना तारेवरची कसरत करावी लागेल

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्यावे लागेल महिलांना झोपेच्या तक्रारी जाणवतील   

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज घरामध्ये विवाह ठरवण्याच्या चर्चा रंगल्यामुळे तरुण वर्ग सुखावून जाईल प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल   

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज राजकारणात मुरलेल्या लोकांना जनतेचा प्रतिसाद चांगला मिळेल, कामाचे उत्तम नियोजन आणि सूत्रबद्धता तुमचा दर्जा वाढेल   

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज व्यवसायात भागीदारास तुमच्या नवीन कल्पनांचे सुतवाचक कराल आणि त्यातून थोडेसे मतभेद निर्माण होतील   

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तब्येत सांभाळा चुकीची औषधे घेत नाही ना याची काळजी घ्या 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली, तर मात्र मनावर ताबा ठेवणे आवश्यक असेल, थोडा अविचार होण्याची शक्यता आहे    

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज जोडीदाराला प्रवासाचे योग येण्याची शक्यता, त्यामुळे थोडी चिडचिड होईल महिलांनी प्रकृती सांभाळावी          

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज तरुणांना आपला आयुष्याचा जोडीदार सोडण्यासाठी उत्तम काळ आहेएखादा निर्णय घेताना स्वतःच संभ्रमात पडाल      

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज घरामध्ये हलकेफुलके वातावरण राहिले तरी शब्द हे शस्त्र आहे हे मात्र लक्षात ठेवायला हवे

हेही वाचा :           

Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी नशीब पालटणारे! जबरदस्त आदित्य योग बनतोय, श्रीमंत बनण्याची इच्छा पूर्ण होणार...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)