Astrology : आज अमला योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृषभसह 'या' 5 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, उत्पन्नाचे मार्ग मोकळे होणार
Astrology Panchang Yog 09 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 09 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 9 एप्रिलचा दिवस म्हणजेच बुधवारचा दिवस आहे. आजचा दिवस गणपती बाप्पााला समर्पित आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आज अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. यामध्येच अमला योग (Yog) निर्माण झाला आहे. तसेच, आजच्या दिवशी पूर्वाफाल्गुनी नक्षत्रासह बुधादित्य योग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या शुभ राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. उन्नतीचा असणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या लव्ह लाईफमध्ये जोडीदाराबरोबरचा काळ सर्वात चांगला जाणार आहे. आज तुम्ही नवीन काहीतरी संकल्प करण्याचा विचार कराल. तसेच, जे लोक कोचिंग आणि शिक्षणाशी संबंधित हुद्द्यावर काम करतात त्यांना आज चांगला लाभ मिळू शकतो.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या कुटुंबात आनंदी आणि समाधानाचं वातावरण पाहायला मिळेल. तुमच्या घरात पाहुण्यांची ये-जा असेल. तसेच, तुम्हाला तुमच्या कलेचा आज चांगला लाभ घेता येईल. चार लोकांसमोर तुमच्यातील कलागुणांचं कौतुक केलं जाईल. तसेच, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा तुम्हाला चांगला सपोर्ट पाहायला मिळेल. लवकरच तुमच्या कामामुळे तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुम्ही फार उत्सुक असाल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. आज तुमच्या व्यवसायाचा विस्तार अधिक वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या घरातील लहान मूल आजारी असेल तर त्याच्या आरोग्यात सुधारणा पाहायला मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुमच्यासाठी ही एक मोठी संधी आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, ज्या तरुणांना नवीन नोकरी मिळवायची आहे. त्यांच्यासाठी चांगली संधी चालून येणार आहे. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळणार आहे. लवकरच तुम्ही धार्मिक यात्रेत सहभागी होऊ शकता.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. सरकारी योजनांचा तुम्हाला लाभ घेता येईल. कुटुंबियांच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढलेल्या असतील. प्रॉपर्टीशी संबंधित तुमचे जुने वाद मिळतील. मित्रांचा तुम्हाला चांगला लाभ मिळणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे काम लवकरच पूर्ण होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















