Astrology Panchang 29 November 2024 : आज शुक्रवार, 29 नोव्हेंबर रोजी चंद्र तूळ राशीनंतर वृश्चिक राशीत जाणार आहे, त्यामुळे चंद्र आणि मंगळ एकमेकांपासून केंद्रस्थानी राहतील आणि लक्ष्मी योग तयार होईल. तसेच आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी असून या दिवशी लक्ष्मी योगासोबत शोभन योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 4 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जर तुमचे तुमच्या सासरच्या लोकांशी संबंध चांगले नसतील तर आजपासून तुमचे संबंध सुधारतील. जुन्या मित्रांच्या मदतीने आज तुम्ही काही नवीन मित्रांना भेटू शकता आणि कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन देखील करू शकता. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आज तुम्हाला या संदर्भात चांगली बातमी मिळण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं तर, जर तुमच्या जोडीदारावरचा विश्वास कमी होत असेल तर त्यासाठी बोलावं लागेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. आज तुमची काही प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडाल. जर तुम्ही कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्यासाठी चांगला असेल, देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असेल. जर तुम्हाला जमीन आणि वाहन घ्यायचं असेल तर आज अचानक धनप्राप्ती झाल्यामुळे ही इच्छा पूर्ण होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याला सरकारी नोकरी मिळू शकते, त्यामुळे कुटुंबातील सर्वजण खूप आनंदी दिसतील. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. वृश्चिक राशीचे लोक आज जे निर्णय घेतील, त्यातून त्यांना खूप फायदा होईल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आज काही नवीन संधी मिळू शकते. मुलांचं चांगलं काम पाहून मन प्रसन्न राहील आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने जुन्या गुंतवणुकीतून चांगलं उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. जर तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल तर तो तुम्हाला मित्राच्या मदतीने मिळेल. कुटुंबातील परिस्थिती सामान्य राहील आणि सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहील. तुम्ही संध्याकाळी मित्रांसोबत पार्टी करू शकता.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. मकर राशीच्या लोकांना आज देवी लक्ष्मीच्या कृपेने काही नवीन कौशल्य विकसित होतील. या राशीचे विद्यार्थी जे उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्यांची ही इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या वडिलांच्या मदतीने काही मालमत्ता मिळवण्याची तुमची इच्छा आज पूर्ण होईल आणि अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखाद्या खास व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो. आज चांगला नफा मिळवण्याबरोबरच व्यावसायिकांना व्यवसायात नवीन डील करण्याची संधीही मिळेल. नोकरी करणाऱ्यांना आज दुसऱ्या कंपनीत मुलाखतीसाठी जाण्याची संधी मिळू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: