Astrology Panchang 29 January 2025 : आज म्हणजेच, 29 जानेवारीला पौष महिन्यातील अमावस्या तिथीचा एक चांगला योग आहे. तसेच आज मकर राशीत सूर्य, बुध आणि चंद्राच्या संयोगामुळे त्रिवेणी योग (Triveni Yog) आणि शशि आदित्य योग (Shashi Aditya Yog) तयार झाला आहे. याशिवाय आज बुधादित्य योगही (Budhaditya Yog) जुळून आला आहे, याशिवाय आज शुभ श्रवण नक्षत्राचा योग असून त्यासोबत सिद्धी योगही (Siddhi Yog) तयार होत आहे. या योगांमुळे आज अमावस्येचा (Mauni Amavasya 2025) दिवस 3 राशींसाठी भाग्याचा असणार आहे. या लकी राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांनी आज कोणत्याही प्रकारचे वाद टाळले तर तुमचा दिवस सुखाचा आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करत असाल तर त्यात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी किंवा व्यवसायात तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहावं लागेल. ते तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. संध्याकाळी तुम्ही मंदिरात जाऊ शकता. यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायद्याचा असेल. कुटुंबात सलोख्याचं वातावरण राहील.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशाने भरलेला असेल. दिवसाची सुरुवात चांगली होईल आणि त्यानंतर तुम्ही व्यस्त असाल. आईशी मतभेद झाल्याने मन थोडं अस्वस्थ होऊ शकतं. आज व्यवसायात जोखीम घेतल्यास चांगला नफा मिळू शकतो. वैवाहिक जीवनात आनंद राहील. आज तुम्ही घरातील महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आज अनुभवी लोकांशी बोलून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. एकंदरीत, सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. कौटुंबिक जीवनातही आनंद राहील.


मकर रास (Capricorn)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायात शुभ परिणाम देणारा असेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. व्यवसायात नवं काम लाभदायक ठरेल. लव्हबर्ड्स रोमँटिक डिनरचा प्लॅन करू शकतात. तुम्ही जुन्या कर्जापासून मुक्त होऊ शकता, ज्यामुळे तुमच्या डोक्यावरचा भार हलका होईल. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवाल. व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे चांगला नफा मिळेल. नोकरीत बॉसकडून उत्तम सहकार्य लाभेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Mauni Amavasya : यंदाची पौष अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 28 जानेवारीपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले


Shani Gochar 2025 : मौनी अमावस्येला शनि बनवणार शक्तिशाली राजयोग; 29 जानेवारीपासून 3 राशींना अच्छे दिन, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार