Benefits of Wearing 1 Mukhi Rudraksha : ज्योतिष शास्त्रानुसार, देवों के देव महादेव म्हणजेच भगवान शंकराची (Lord Shiva) पूजा, भक्ती अनेक प्रकारे केली जाते. भगवान शंकराची कृपा राहावी म्हणून अनेक भक्त शंकराची पूजा करतात. अनेक मंदिरात, शिवालयात जाऊन शिवलिंगाचा अभिषेक करतात. तसेच, मंदिरात भजन, किर्तन करतात.
तसेच, प्राचीन काळापासून आध्यात्मिक भक्त आणि भाविकांकडून शिव भक्तीसाठी एक मुखी रुद्राक्षाची पूजा केली जाते. या एक मुखी रुद्राक्षाला भगवान शंकराचं स्वरुप मानलं जातं. तसेच, असंही म्हटलं जातं की, जी व्यक्ती हे एक मुखी रुद्राक्ष धारण करतात त्यांच्यावर भगवान शंकराचा नेहमी आशीर्वाद असतो. पण, या एक मुखी रूद्राक्षाचं महत्त्व नेमकं काय? तसेच, हे रुद्राक्ष धारण करण्याचे नियम नेमके कोणते आहेत?
एक मुखी रूद्राक्षाचं महत्त्व
भगवान शंकराचं स्वरुप मानल्या जाणाऱ्या एक मुखी रूद्राक्षाचं पौराणिक महत्त्व आणि इतिहास फार मोठा आहे. असं म्हणतात की, जे कोणी या एक मुखी रुद्राक्षाची पूजा करतात त्यांच्या घरात आणि कुटुंबात चांगली सुख, शांती येते. तसेच, मृत्यूचं भयदेखील दूर होतं.
एक मुखी रुद्राक्ष कोणी धारण करावं आणि नियम काय?
असं म्हणतात की, एक मुखी रुद्राक्ष डॉक्टर, वकील आणि प्रोफेसर यांनी घालणं फार शुभ मानलं जातं. तसेच, हे रुद्राक्ष धारण करण्यासाठी लाल धाग्यासह पेंडेंट म्हणून देखील तुम्ही वापरू शकता. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की, रुद्राक्ष कधीही काळ्या रंगाच्या धाग्यात वापरु नये. यामुळे अशुभ परिणाम होतो. हे एक मुखी रुद्राक्ष धारण करण्याआधी रुद्राक्ष मंत्राचा 9 वेळा जप करणं गरजेचं आहे. हे धारण केल्यानंतर, तामसिक भोजन करु नये. जर रुद्राक्षाचा धागा खराब झाला असेल तर तो लगेच बदला. हे धारण केल्यानंतर अशुद्ध स्थानी जाऊ नका.
एक मुखी रुद्राक्ष वापरण्याचे फायदे
- एक मुखी रुद्राक्ष घातल्याने व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते.
- एक मुखी रुद्राक्ष घातल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात.
- एक मुखी रुद्राक्ष योग आणि ध्यान करताना लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करतात.
- एक मुखी रुद्राक्ष घातल्याने तुमचा तणाव कमी होऊ शकतो.
- हे तुमचं हृदय, रक्ताभिसरण आणि डोळ्यांच्या दृष्टीसाठी फार चांगलं मानलं जातं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :