Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधन म्हणजेच राखीचा पवित्र सण. बहीण-भावाच्या अतूट नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन (Raksha Bandhan). या पवित्र सणाची बहिणी वर्षभर अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. पौराणिक मान्यतेनुसार रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. मात्र, यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ आहे. त्यामुळे भावाला राखी नेमकी कधी बांधावी? राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय? या संदर्भात अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत.  


रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कधी? (Raksha Bandhan 2024 Shubh Muhurta)


रक्षाबंधनाचा सण 19 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानुसार, शुभ मुहूर्त दुपारी 1:30 ते रात्री 9.08 पर्यंत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी या दरम्यान तुम्ही भावांना राखी बांधू शकता.  


जाणून घ्या भद्रकाळाची वेळ (Bhadra kaal Time)


यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी  भद्रकाळ असणार आहे. त्यामुळे भद्रकाळाची वेळ पहाटे 5.53 ते दुपारी 01.32 पर्यंत असणार आहे. ही भद्रा पाताळाची आहे. अनेक विद्वानांच्या मते भद्राचे निवासस्थान पाताळात किंवा स्वर्गात असेल तर ती पृथ्वीवरील लोकांसाठी अशुभ नसते. ती शुभ मानली जाते. मात्र, तरीही या दरम्यान बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधणे टाळावे. काही कारणास्तव भद्रकाळात राखी बांधावी लागली तर प्रदोष काळात अमृत, शुभ आणि लाभाची वेळ पाहून राखी बांधता येते. 


भाद्रात राखी का बांधू नये?


भाद्र काळात राखी बांधणे अशुभ मानले आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार, भद्रकालमध्ये लंकेचा राजा रावणाच्या बहिणीने राखी बांधली होती, ज्यामुळे रावणाचा नाश झाला.


भद्रकाल अशुभ मानले जाते?


भद्रकालमध्ये राखी बांधणे अशुभ मानले जाते, त्यामागे एक आख्यायिका अशी आहे की, शनिदेवाच्या बहिणीचे नाव भद्रा होते. भद्राचा स्वभाव अतिशय क्रूर होता, ती प्रत्येक शुभ कार्य, पूजा, यज्ञ यात व्यत्यय आणत असे. त्यामुळे भद्रकालमध्ये कोणतेही शुभ कार्य करणे चांगले मानले जात नाही. त्याचे परिणाम अशुभ मानले जातात.


रक्षाबंधनाचं पौराणिक महत्त्व


राखीच्या धाग्याला रक्षासूत्र संबोधलं जातं. राजसूय यज्ञाच्या वेळी भगवान कृष्णाला द्रोपदीने रक्षासूत्र म्हणून पदराची चिंधी बांधली होती. तेव्हापासून ही परंपरा सुरु झाली, असं सांगण्यात येत आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shravan Somvar 2024 : श्रावणी सोमवारनिमित्त भगवान शंकराला बेलपत्र वाहताना अशी घ्या काळजी; धन-संपत्तीसाठी 'असा' करा बेलाचा वापर