Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकची (Paris Olympics 2024) काल (11 ऑगस्ट) सांगता झाली. 26 जुलैपासून ही स्पर्धा खेळवली गेली. या स्पर्धेत जगभरातील 10 हजारांहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. भारताकडून एकूण 117 खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला. 


पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण 6 पदके जिंकली आहेत. 5 कांस्य आणि 1 रौप्य पदके आहेत. नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले. भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले होते. नेमबाजीत देशाला तीन पदके मिळाली आहेत. हे तिन्ही कांस्य पदके आहेत. कुस्तीतूनही पदक मिळाले आहे. अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदक जिंकले. 


ऑलिम्पिकची स्पर्धा संपताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि मनू भाकरची (Manu Bhaker) आई यांच्यात चर्चा होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मनू भाकरची आई नीरज चोप्राचा हात आपल्या डोक्यावर ठेवताना दिसत आहे. बाहेर आवाज जास्त असल्याने दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे कळू शकलेलं नाही. त्यामुळे नेटकऱ्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहे. 






नेटकरी काय म्हणाले?


सदर व्हिडीओवरुन नीरज चोप्राची आई मनू भाकरसोबत लग्नाची चर्चा करत असल्याचं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर मनू भाकरची आई जावयाच्या शोधात असून लग्नाची चर्चा सुरु असल्याचं म्हटलं आहे. एका युजर्सने मग...ठरलं का?, लग्नाची सुपारी फोडायची का?, असंही म्हटलं आहे. 










नीरज चोप्रा आणि मनू भाकरची चर्चा-


रौप्य पदक जिंकल्यानंतर मनू भाकर आणि नीरज चोप्रा यांच्यात संवाद झाला. यावेळीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यामुळे या व्हिडीओवरुनही सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे. यावेळी मनू भाकरची आई दोघांचा एकत्र फोटो काढण्यासाठी पुढे येते. यावेळी मनू भाकर फोटो नको असं म्हणत पुढे जाते. 






कोण आहे मनू भाकर?


22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे. जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.


संबंधित बातमी:


विनेश फोगाटच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, सीएएसही पेचात; पदक मिळणार जवळपास निश्चित?, महत्वाची माहिती समोर