Astrology : भारतीय समाजात सोन्याच्या दागिन्यांबाबत (Gold Jewellery) वेगळेच आकर्षण आहे. मंदिरांतील देवतांनाही सोन्याच्या धातूने सजवण्यात येते. सोने प्रत्येकाला प्रिय आहे आणि ते सर्वात मौल्यवान धातूंपैकी एक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) काही राशींसाठी सोने परिधान करणे खूप भाग्यवान समजले जाते, तर काही राशींसाठी ते शुभ मानले जात नाही. जाणून घ्या, सोने परिधान करण्याचे कोणते फायदे आहेत आणि कोणी सोने घालू नये?


सोन्याच्या धातूचे फायदे
सोनेरी धातू धारण केल्याने आध्यात्मिक आणि आरोग्याच्या बाबतील वेगवेगळे फायदे होतात. ज्योतिष शास्त्रानुसार तर्जनी बोटात सोन्याची अंगठी धारण केल्याने एकाग्रता वाढते आणि राजयोग प्राप्तीसाठी उपयुक्त मानले जाते. दुसरीकडे, अनामिकामध्ये सोन्याची अंगठी घातल्याने संतती सुख मिळते. सर्दी किंवा श्वसनाचे आजार असल्यास करंगळीत सोन्याचे दागिने घालावेत. वैवाहिक जीवनातही आनंद मिळवण्यासाठी सोन्याचे दागिने महत्त्वाची भूमिका बजावतात. असे म्हणतात की, लग्नानंतर मूल होईपर्यंत हिरा धारण करणे विवाहित जीवनासाठी शुभ मानले जात नाही, तर सोने परिधान करणे शुभ मानले जाते.



मेष : नशीब साथ देईल
ज्योतिष शास्त्रानुसार जर तुमची राशी मेष असेल तर सोन्याची अंगठी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. हा धातू धारण केल्याने तुमचे धैर्य आणि शौर्य वाढते. प्रत्येक क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढते. यासोबतच नशीबही तुमची साथ देते, त्यामुळे तुमची सर्व कामे सहज पूर्ण होतात. जर आपण कौटुंबिक जीवनाबद्दल बोललो, तर जोडीदाराबरोबरचे नाते घट्ट होते आणि पालकांचा आशीर्वाद प्राप्त होतो. मित्र आणि प्रियजन नेहमीच तुम्हाला साथ देतात. सोन्याची अंगठी धारण केल्याने तुम्हाला हळूहळू जुन्या कर्जातून मुक्ती मिळेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील.



सिंह : ऊर्जा आणि उत्साह वाढेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी सोनेरी धातू शुभफळ आणते. त्यामुळे या राशीच्या लोकांनी सोन्याची अंगठी घातलीच पाहिजे. हे अग्नी तत्वाचे चिन्ह आहे आणि राशीचा स्वामी सूर्य आहे, ज्याचे गुरू ग्रहाशी मैत्रीपूर्ण संबंध आहे, म्हणूनच या राशीच्या व्यक्तीचा सोने धारण केल्याने ऊर्जा आणि उत्साह वाढतो आणि सर्व कामे सहज पूर्ण होतात. नोकरी आणि व्यवसायातही प्रगती आहे. त्यामुळे कोणत्याही योजनेत वाढीव लाभ मिळतो. मित्र आणि प्रियजनांशी संबंध दृढ होतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


महत्वाच्या बातम्या


Numerology : 'या' तारखेला जन्मलेले लोक धनसंपत्तीच्या बाबतील असतात खूप भाग्यवान, सदैव असतो कुबेराचा आशीर्वाद