Numerology Prediciton Mulank 7 : ज्योतिष शास्त्राप्रमाणे ( Astrology ) अंकशास्त्राच्या आधारावर एखाद्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व सांगितलं जाऊ शकतं. जन्मतारखेच्या आधारावर सबंधित व्यक्तीचा स्वभाव आणि इतर गोष्टी समजू शकतात. याशिवाय, अंकशास्त्रानुसार माणसाचं भविष्य देखील ओळखता येतं. यासाठी फक्त जन्मतारीख आवश्यक आहे. अंकशास्त्राच्या आधारावर भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्राचा उपयोग करून त्या व्यक्तीसाठी कोणते करीअर, कोणता व्यवसाय लाभदायक ठरेल, कुठला रंग वापरल्यास फायदा होईल, अशा अनेक गोष्टी सांगता येतात.
अंकशास्त्रानुसार, 7 जन्मांक किंवा मूलांक असलेले लोक संपत्ती, जमीन आणि मालमत्तेच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात. त्यांच्यावर कुबेर देवाच्या आशीर्वादांचा वर्षाव होतो. त्यांची इतर वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
जन्मांक 7
अंकशास्त्रानुसार, ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला झाला असेल. त्यामुळे त्या व्यक्तीचा मूलांक किंवा मूलांक 7 असतो. अंकशास्त्रानुसार मूलांक 7 असलेल लोकांवर कुबेराचा आशीर्वाद असतो. त्यांच्या कृपेने त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. जमीन, मालमत्ता आणि पैशाच्या बाबतीत हे लोक खूप भाग्यवान असतात.
अंकशास्त्रानुसार जन्मांक 7 असलेले लोक खूप भाग्यवान असतात. या लोकांनी कोणतंही काम केल्यास त्यांना त्यामध्ये यश मिळतं. या लोकांना कमी मेहनत करूनही आयुष्यात अधिक यश मिळतं. मूलांक 7 असलेले लोक खूप मेहनती आणि बुद्धिमान असतात. या लोकांनी एखादी गोष्ट करायची असं ठरवल्यावर ती पूर्ण केल्याशिवाय हे लोक शांत बसत नाहीत.
अंकशास्त्रानुसार मूलांक 7 असलेले लोक स्वतंत्र विचारांचे असतात. हे लोक कोणाच्याही दबावाखाली येत नाहीत. त्यांना मुक्त विचारांवर आयुष्य जगायला आवडतं.
अंकशास्त्रानुसार जन्मांक कसा ठरवावा?
अंकशास्त्राच्या आधारावर, जन्मतारिखेनुसार अनेकांचे दोष आणि गुणधर्म सांगितले जाऊ शकतात. अंकशास्त्रामध्ये 1 ते 9 असे अंकांनुसार भविष्य सांगितलं जातं. अंकशास्त्रात जन्मांक हा सर्वात महत्वाचा अंक असतो. याला मूलांक असंही म्हणतात. तुमच्या जन्म तारखेपासून मिळणारा अंक म्हणजे जन्मांक. जसे की, 1, 10 (1+0=1), 19 (1+9=10) , 28 (2+8=10) या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 1 असतो. तर 2, 11( 1+1=2), 20( 1+2=2), 29( 2+9=11) या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 2 असतो.
कुटुंबासाठीही ठरतात भाग्यवान
अंकशास्त्रानुसार, 7 जन्मांक असलेले लोक स्वतःसाठी तसेच त्यांच्या कुटुंबासाठीही भाग्यवान सिद्ध होतात. त्याच्या जन्मानंतर कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारू लागते. घरात सुख-समृद्धी आणि संपत्ती वाढते.