Earthquake & Eclipse Astrology News : मंगळवारी म्हणजेच काल वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (Chandra Grahan 2022) झाले. चंद्रग्रहणाच्या वेळेबाबत तसेच अनेक गोष्टींवर अनेक मत-मतांतरे पाहायला मिळाली, मात्र हे चंद्रग्रहण संपताच त्याच रात्री भारताच्या उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यात झालेल्या भूकंपाच्या (Earthquake In UP Nepal) जोरदार धक्क्याने नागरिक हादरले. या भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये असल्याचे सांगण्यात आले. या भूकंपामुळे अनेक जण भयभीत झाले असून सोशल मीडीयावर (Social Media) लोकं आपला अनुभव सांगताना दिसत आहे. तसेच या भूकंपाचा संबंध चंद्रग्रहणाशी तर नाही ना? असे विविध प्रश्न विचारले जात आहेत. 


भूकंप, चक्रीवादळसारख्या नैसर्गिक आपत्तींचा ग्रहणांशी संबंध आहे का?
चंद्रग्रहणाच्याच रात्री म्हणजचे मंगळवारी रात्री उशिरा दिल्ली सहित अनेक शहरांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले. या भूकंपाचा परिणाम संपूर्ण उत्तर भारतावर दिसून आला. ज्याची तीव्रता 6.3 इतकी होती.  पण भूकंप, चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा ग्रहणांशी काही संबंध आहे का? नेमकं काय गणित आहे? ज्योतिषांच्या मते, चंद्रग्रहणाचा थेट संबंध भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीशी असतो. ग्रहण हे ज्योतिषशास्त्रात अशुभ आणि घातक परिणाम करणारे मानले जाते. यापूर्वीची घटना पाहिली तर, 31 जानेवारी 2018 रोजी चंद्रग्रहण झाले होते, तेव्हा देखील दिल्ली-एनसीआर, पाकिस्तान आणि कझाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी होती. ज्योतिषांच्या मते, कालही चंद्रग्रहण झाले, आणि पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. चंद्रग्रहण पूर्ण झाल्यानंतर काही तासांतच भूकंपाचे जोरदार धक्के बसले आणि पृथ्वी हादरली. प्राचीन गणिततज्ज्ञांच्या बृहत संहितेनुसार भूकंप होण्यामागे काही कारणे आहेत, ज्याचे संकेत आधीच मिळतात. यापैकी एक म्हणजे ग्रहण योग आहे. 


'या' 80 दिवसांमध्ये कधीही भूकंप येऊ शकतो?
विज्ञानातील माहितीनुसार, टेक्नोटिक प्लेट्सच्या टक्करमुळे भूकंप होतात आणि मग त्यातून त्सुनामी येते, तर ज्योतिषशास्त्रानुसार टेक्टोनिक प्लेट्स ग्रहांच्या प्रभावाने हलतात आणि आदळतात. भूकंपाची तीव्रता प्लेट्सवरील ग्रहांच्या प्रभावावर अवलंबून असते. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते, जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. जेव्हा ग्रहण होते किंवा येणार आहे, तेव्हा त्याच्या 40 दिवस आधी किंवा 40 दिवसानंतर भूकंप होतो. म्हणजेच 80 दिवसांमध्ये कधीही भूकंप येऊ शकतो. कधीकधी हा कालावधी आणखी कमी असतो आणि 15 दिवस आधी किंवा 15 दिवसांनी भूकंप होतो.


ज्योतिषशास्त्र तसेच धार्मिक मान्यता काय?
धार्मिक मान्यतांनुसार चंद्रग्रहणाचा परिणाम जल आणि समुद्रावर होतो. ग्रहण आधीच येणार्‍या नैसर्गिक आपत्तीबद्दल सूचित करतात. यावर अनेकांचा विश्वास असला तरी काहींना नसतो. साधारणपणे, सूर्यास्त होईपर्यंत आणि मध्यरात्री सूर्योदय होईपर्यंत भूकंप होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या भागात ग्रहणाचा स्पष्ट प्रभाव दिसतो, जिथे पृथ्वीच्या भूगर्भात अनेक विचित्र हालचाली जाणवतात, त्या भागात भूकंप होण्याची शक्यता जास्त असते. भूकंप पृथ्वीच्या विशेष प्लेट्सजवळच होतात. ग्रहणात ग्रह एकमेकांवर सावल्या पाडतात. ही सावली चंद्रावर पडते आणि त्याचा पृथ्वीवर, दोन्हीवर परिणाम होतो. याशिवाय, जेव्हा सूर्याची किरणे पृथ्वीवर पडत नाहीत, तेव्हा चंद्र आणि पृथ्वी दोन्ही प्रभावित होतात. ग्रहणानंतर वाऱ्याचा वेग बदलतो. पृथ्वीवर गडगडाट आणि वादळांचा प्रभाव वाढतो. 


ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला खूप महत्त्व
ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला खूप महत्त्व आहे. ज्योतिषांच्या मते, ग्रहणाच्या वेळी जेव्हा पृथ्वी आणि चंद्र सूर्याच्या पुढील दिशेने एका सरळ रेषेत येतात, तेव्हा भूगर्भीय हालचालींची शक्यता वाढते. कारण त्याचा परिणाम लोकांच्या जीवनावर होतो. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो तेव्हा गुरुत्वाकर्षणाचा सर्वात जास्त परिणाम होतो. यामुळे, पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात सर्वाधिक भरती येते आणि ग्रहणाचा प्रभाव आणखी वाढतो. गुरुत्वाकर्षण वाढल्यामुळे आणि कमी झाल्यामुळे हे भूकंप होतात, असे बोलले जाते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


इतर महत्वाच्या बातम्या


Earthquake : दिल्ली-NCR ते उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, नेपाळमध्ये भूकंपाचं केंद्र; 3 जणांचा मृत्यू