एक्स्प्लोर

Dhanteras 2022 : 22 की 23 ऑक्टोबर? धनत्रयोदशी कोणत्या दिवशी साजरी करावी? जाणून घ्या

Dhanteras 2022 : यावेळी दिवाळी 24 ऑक्टोबरला साजरी होणार असली तरी धनत्रयोदशीच्या तारखेबाबत 22 की 23 ऑक्टोबरला साजरी करावी? याबाबत मतभेद आहेत.

Dhanteras 2022 : दिवाळी (Diwali 2022) हा हिंदूंचा सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळी हा सण 5 दिवस साजरा केला जातो. दिवाळीच्या सणाची सुरुवात धनत्रयोदशीने होते. हिंदू कॅलेंडरनुसार, धनत्रयोदशी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला असे मानले जाते. धनत्रयोदशीला सोने, चांदी, दागिने आणि भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. धनत्रयोदशीला खरेदी केलेल्या वस्तू तेरा पटींनी वाढतात अशी पौराणिक मान्यता आहे. धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी, भगवान कुबेर यांच्यासह लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी घरोघरी दिवे लावले जातात. यावेळी दिवाळी 24 ऑक्टोबरला साजरी होणार असली तरी धनत्रयोदशीच्या तारखेबाबत 22 की 23 ऑक्टोबरला साजरी करावी? याबाबत मतभेद आहेत. जाणून घेऊया धनत्रयोदशीची तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व..

धनत्रयोदशी कधी असते?

कार्तिक महिन्याची त्रयोदशी तिथी 22 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 06.02 वाजता सुरू होत आहे आणि 23 ऑक्टोबर 2022 रोजी त्रयोदशी तिथीच्या संध्याकाळी 06.03 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत यावेळी दोन्ही दिवशी धनत्रयोदशीचा साजरी केली जाणार आहे.

23 तारखेला दिवसभर 'हा' सर्वार्थसिद्धी योग 
शास्त्रानुसार  त्रयोदशीलाच दिवा दान करावा. धनत्रयोदशीला सायंकाळी कुबेर-लक्ष्मीची पूजा केली जाते. त्यामुळे त्रयोदशी तिथी सायंकाळची असल्याने धनत्रयोदशी 22 ऑक्टोबरलाच साजरी केली जाईल. दुसरीकडे, खरेदीचे इतर शुभ कार्य देखील 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी केले जाऊ शकतात. तर धन्वंतरी जयंती उदयकालिक त्रयोदशी तिथीला साजरी केली जाते, म्हणून 23 ऑक्टोबर रोजी धन्वंतरी जयंतीला भगवान धन्वंतरीची पूजा केली जाईल. 23 तारखेला दिवसभर सर्वार्थसिद्धी योग राहील. त्यामुळे सर्व प्रकारची खरेदी, गुंतवणूक आणि नवीन सुरुवात करण्यासाठी संपूर्ण दिवस शुभ राहील. अशा प्रकारे 22 आणि 23 व्या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाईल. 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी यमाला प्रसन्न करण्यासाठी दिवे दानही केले जातील. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला आजपासून सुरुवात होणार आहे.

धनत्रयोदशीचा खरेदीसाठी शुभ मुहूर्त

कोणतेही शुभ कार्य शुभ काळात केले तर त्यातून मिळणारे लाभ आपोआप वाढतात. त्यामुळे कोणत्या शुभ मुहूर्तावर धनत्रयोदशीची खरेदी करून जास्तीत जास्त फायदा मिळवता येईल, शुभ काळ 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 05:43 ते 07:19 पर्यंत राहील. यानंतर सायंकाळी 07:19 ते 08:54 या वेळेत अमृतकाळ सुरू होईल. धनत्रयोदशीच्या खरेदीसाठी संध्याकाळी 05:43 ते रात्री 10:30 पर्यंतचा काळ शुभ आहे. यावेळी धनत्रयोदशीची खरेदी जोरदार करावी.

धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्य गेटवर 13 दिवे लावा
ज्या घरामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजासाठी दिवा लावला जातो. असे म्हणतात की, की तिथे अकाली मृत्यू होत नाही, धनत्रयोदशीच्या संध्याकाळी घरात फक्त 13 दिवे लावावेत. यमराजाला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर दक्षिणाभिमुख दिवा लावावा. वास्तविक दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. असेही मानले जाते की या दिवशी घरात दिवा लावल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

संबंधित बातम्या

Dhanteras 2022: धनत्रयोदशीच्या दिवशी 'या' चुका करू नका, नाहीतर वर्षभर आर्थिक चणचण भासेल

महत्त्वाच्या बातम्या

Navpancham Rajyog 2026 : सूर्य-शनिचा मिळून बनणार नवपंचम राजयोग; 'या' 4 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, जबरदस्त धनलाभाचे संकेत
सूर्य-शनिचा मिळून बनणार नवपंचम राजयोग; 'या' 4 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, जबरदस्त धनलाभाचे संकेत
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Shravan 2026 : श्रावणात श्रावणी सोमवारनिमित्त भगवान शंकराला बेलपत्र वाहताना अशी घ्या काळजी; धन-संपत्तीसाठी 'असा' करा बेलाचा वापर
श्रावणात श्रावणी सोमवारनिमित्त भगवान शंकराला बेलपत्र वाहताना अशी घ्या काळजी; धन-संपत्तीसाठी 'असा' करा बेलाचा वापर
Hindu Religion: श्रावण शुक्रवारी 'वैभवलक्ष्मी व्रत' का करतात? पुरूषही करू शकतात हे व्रत? शुक्रवारीच का करतात? व्रताचे नियम, धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत...
श्रावण शुक्रवारी 'वैभवलक्ष्मी व्रत' का करतात? पुरूषही करू शकतात हे व्रत? शुक्रवारीच का करतात? व्रताचे नियम, धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत...

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Embed widget