Astrology : हिंदू धर्मग्रंथांमध्ये (Hindu Religion) महिलांना देवीचा दर्जा आहे आणि महिलांना तर घरची लक्ष्मी (Goddess Lakshmi) म्हटले आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की ज्या घरात महिला आनंदी असतात, तिथे देवी लक्ष्मीचा वास नेहमीच असतो. जर घरातील स्त्रीमध्येच वाईट सवयी किंवा दुर्गुण असतील तर अशा घरात देवी लक्ष्मीचा वास कसा असेल? महिलांनी अशा वाईट सवयींपासून दूर राहावे. जेणेकरून देवी लक्ष्मीचा वास घरात सदैव टिकून राहील. जाणून घ्या हिंदू धर्मग्रंथात काय म्हटलंय?



अशा सवयी कुटुंबाच्या अधोगतीला कारणीभूत ठरतात
हिंदू धर्मात स्त्रियांच्या अशा काही वाईट सवयींबद्दल सांगण्यात आले आहे, ज्यामुळे घरात दारिद्र्य येते आणि ज्या घरात असे दुर्गुण असलेली स्त्री राहते, त्या घरात देवी लक्ष्मी फार काळ राहत नाही आणि अलक्ष्मीचा वास येतो. स्त्रियांच्या या वाईट सवयींमुळे घर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. याशिवाय महिलांच्या अशा सवयी कुटुंबाच्या अधोगतीला कारणीभूत ठरतात. म्हणूनच जाणून घ्या, अशा कोणत्या वाईट सवयी आहेत ज्या महिलांनी सुधारल्या पाहिजेत.


 


महिलांनी या सवयींपासून दूर राहावे, काय म्हटलंय हिंदू धर्मात



पोळीसाठी जास्त पीठ मळणे आणि उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा वापरणे इ. अनेक महिला हे करतात. 
परंतु घराच्या सुख-समृद्धीसाठी ते चांगले मानले जात नाही.
तुमच्या घरी पाहुणे आल्यावर रागावणे आणि त्यांचे स्वागत न करणे ही देखील चांगली सवय नाही. 
हिंदू धर्मात पाहुण्याला देवासारखे मानले जाते. त्यामुळे तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचा आदर आणि सन्मान करा.
सकाळी उशिरापर्यंत झोपण्याची आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर लगेच झोपण्याची महिलांच्या सवयीमुळे घरात गरिबी येते.
महिलांनी एकादशी, अमावस्या आणि गुरुवारी केस धुवू नयेत.
अशा स्त्रिया ज्या उपवास करत नाहीत आणि नियमित पूजाही करत नाहीत. 
महिलांनी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घर स्वच्छ करावे आणि नंतर स्नान करून पूजा करावी. यानंतरच अन्न घ्यावे. 
ज्या स्त्रिया सकाळी उठून घराची साफसफाई न करता जेवतात, त्यांच्यावर माता लक्ष्मीचा राग कायम असतो.
रात्री स्वयंपाकघर साफ न करता, भांडी न घासता झोपू नका. स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवून झोपल्याने घरात नकारात्मकता वेगाने पसरते.


 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.


इतर बातम्या


Ganesh Chaturthi 2023: यंदाची गणेश चतुर्थी विशेष! वाहन, प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करताय? शुभ मुहूर्त जाणून घ्या