Chaturgrahi Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी आपली चाल बदलतात, ज्याचा माणसांवर आणि जगावर परिणाम होत असतो. जेव्हा तीन किंवा चार ग्रह एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा त्रिग्रही आणि चतुर्ग्रही योग तयार होतात. आता मीन राशीत चार ग्रह एकत्र आल्याने चतुर्ग्रही योग निर्माण झाला आहे.


मीन राशीत सूर्य, बुध, राहू आणि शुक्र ग्रहांचा संयोग झाला आहे आणि चतुर्ग्रही योग निर्माण झाला आहे. हा योग तयार झाल्याने काही राशींच्या धनात वाढ होऊ शकते. याशिवाय या काळात तु्म्हाला नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. चतुर्ग्रही योगामुळे 3 राशींचं भाग्य उजळणार आहे, या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांसाठी चार ग्रहांचं एकत्र येणं फायदेशीर ठरू शकतं. कारण हा संयोग तुमच्या राशीच्या उत्पन्न आणि लाभाच्या घरात तयार होत आहे. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला या काळात चांगला नफा मिळू शकतो. जर तुमचा व्यवसाय आयात-निर्यातीशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. जर तुम्ही हॉटेल, पर्यटन आणि सोने-चांदीशी संबंधित व्यवसाय करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. गुंतवणुकीतून नफा मिळण्याचीही शक्यता आहे.


मिथुन रास (Gemini)


चतुर्ग्रही योगाची निर्मिती मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते, कारण तुमच्या राशीच्या दशम स्थानात हा योग तयार होत आहे. यावेळी सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या लोकांना नोकऱ्या मिळू शकतात. नोकरदारांना पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते. तसेच राजकारणाशी संबंधित असाल तर निवडणूक जिंकू शकता. तुम्हाला काही मोठी पोस्ट देखील मिळू शकतात. त्याच वेळी, तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात.


धनु रास (Sagittarius)


धनु राशीच्या लोकांसाठी चार ग्रहांचा संयोग शुभ ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीतून चौथ्या घरात तयार होणार आहे, त्यामुळे यावेळी तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते. तसेच राजकारणात सक्रिय असाल तर तुम्ही निवडणूक जिंकू शकता. तसेच, यावेळी तुम्ही एखादी मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही काळ चांगला राहील. तुम्ही मनाने आनंदी असाल. आईशी तुमचे संबंध चांगले राहतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Weekly Lucky Zodiacs : नवीन आठवडा 'या' 5 राशींसाठी ठरणार अत्यंत शुभ; विविध स्रोतांतून होणार धनप्राप्ती, नांदणार सुख-समृद्धी