Astrology : आजचा दिवस गुरुवार. आज वृषभ राशीत (Taurus Horoscope) 6 प्रमुख ग्रहांचा संयोग जुळून आला आहे. या दिवशी बुध आणि शुक्र एकाच राशीत असल्यामुळे 'काल योग' जुळून आला आहे. तसेच, आजच्या दिवशी शनी जयंती देखील आहे त्यामुळे अनेकजण उपवास करणार आहेत. एकूणच आजच्या दिवशी शनी जयंतीसह (Shani Jayanti) काल योग, गुरु आदित्य योगासह (Yog) अनेक योग जुळून आल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. त्यामुळे हा दिवस कोणत्या राशींसाठी (Zodiac Sign) लकी ठरणार ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ योग मेष राशीच्या लोकांसाठी फार शुभ ठरणार आहे. आजच्या दिवसात तुम्हाला प्रत्येक कामात आवड निर्माण होईल. तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालवलात तर तुम्हाला नफा मिळविण्याच्या अनेक संधी मिळतील. आज निर्णय घेताना खूप विचारपूर्वक घ्या. तुमचे कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले राहील आणि कुटुंबात शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. उद्या तुम्हाला मित्र आणि भावांकडूनही सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमच्यावरील ओझे कमी होईल.


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे.  आज तुम्हाला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. तसेच, तुमच्या स्वभावात आज सकारात्मक बदल दिसून येतील. तुम्ही जर एखादी गुंतवणूक केली असेल तर त्याचा आज तुम्हाला चांगलाच लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराबरोबरचा आजचा दिवस तुमचा अगदी आनंदात जाईल. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. आज तुमचे रखडलेल पैसे तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनात अनेक सुखसोयी निर्माण होतील. नोकरदार वर्गातील लोकांना उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रेम जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. आज तुम्ही तुमच्या कुटुंबियांसमवेत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचीही योजना आखू शकता. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडताना दिसतील. जर तुम्हाला एखादं नवीन वाहन खरेदी करायचं असेल तर तुम्ही खरेदी करू शकता. अनेक दिवसांपासून जर तुमच्या आयुष्यात संकटं येत असतील तर तुम्हाला आज या समस्यांपासून आराम मिळेल. शनीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतील. तुमचे करिअरही मजबूत होईल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Jayanti 2024 : शनी जयंतीला जुळून येतोय दुर्लभ राजयोग; शनीच्या कृपेने 'या' राशींना मिळणार बंपर लाभ