Astro Tips : हिंदू धर्म मान्यतेनुसार, दान करणं हे नेहमीच पुण्याचं कार्य मानलं जातं. दान केल्याने व्यक्तीचं मन आणि चारित्र्याबद्दल अनेक गोष्टी कळतात. पण, शास्त्रात दानाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. याची जर योग्य वेळी योग्य काळजी घेतली गेली नाही तर व्यक्तीला आयुष्यभर हे पाप भोगावे लागतात. यासाठीच दान करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत.
टोकदार वस्तू दान करु नये
दान करताना एका गोष्टीची काळजी घ्यावी ती म्हणजे कधीही टोकदान वस्तूंचं दान करु नये. जसे की, चाकू, सुई आणि कैची यांसारख्या टोकदार वस्तूंचं दान करु नका. असे केल्याने दान करणाऱ्याच्या आणि दान घेणाऱ्यात फार गैरसमज निर्माण होतात. इतकंच नाही तर, यामुळे घरात वाद देखील सुरु होतात.
भांडी कधीही दान करु नका
तु्म्हाला जर दान करायचं असेल तर नेहमी लक्षात ठेवा की कोणालाही दान करताना भांडी दान करु नका. यामध्ये स्टीलची भांडी दान करु नका. यामुळे घरातील सुख-शांती हळूहळू नाहीशी होते. तसेच, स्टीलची भांडी दान केल्याने व्यवसायात नुकसानीचा सामना करावा लागतो.
शिळं अन्न दान करु नका
एक गोष्ट लक्षात ठेवा की, कधीही कोणाला दान करताना शिळं अन्न चुकूनही दान करु नका. यामुळे तुम्हाला आयुष्यभर पश्चात्ताप करावा लागू शकतो. यामुळे नेहमीच स्वच्छ आणि ताजं अन्न दान करावे.
झाडू दान करु नका
हिंदू धर्म मान्यतेनुसार, झाडूला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते. यासाठीच कोणालाही दान करताना झाडू दान करु नका. यामुळे घरात आर्थिक चणचण भासते. इतकंच नाही तर झाडू दान केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो.
दान करताना या गोष्टींची काळजी घ्या
जर तुम्हालाही गरजू व्यक्तींना दान करायचं असेल तर, यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसे की, दान करताना तुमचं मन पवित्र असलं पाहिजे. दान नेहमी गरजूंनाच करावं. दान करताना दिलेल्या वस्तूंचा कधीही अनादर करु नये. तसेच, दान करताना दिलेल्या वस्तूंची कधीच कोणाशीही तक्रार करु नये.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )
हे ही वाचा :