Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मध्यरात्री 2 वाजता पुण्यात दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील आज पुणे न्यायालयात हजर राहणार आहेत. मनोज जरांगे यांच्या विरोधात पुणे न्यायलयाने वॉरंट जाहीर केलं होतं.नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) आणि इतर दोन जणांच्या विरोधात पुणे कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. दोन तारखेला हजर होऊ असं मनोज जरांगे यांच्या वकीलांकडून मागच्या वेळी सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आज मनोज जरांगे पुण्यात दाखल झाले आहेत. आज ते पुणे न्यायलयाने हजर राहणार आहेत.
काय आहे प्रकरण?
मनोज जरांगे पाटलांविरोधात (Manoj Jarange Patil) वारजे येथील धनंजय घोरपडे यांनी फिर्याद दिली होती. यामध्ये मनोज जरांगे यांच्यासह आणखी दोन जणांची नावे घेण्यात आलेली आहेत. या प्रकरणामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. त्याचबरोबर कोर्टाने मनोज जरांगे यांना दोन वेळा कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते.
त्यावेळी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) आंदोलनामुळे पुण्यात कोर्टात हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे दोन वेळा हजर राहण्यासाठी समन्स बजावून देखील हजर न झाल्याने कोर्टाने मनोज जरांगे यांच्यासह अन्य दोन जणांवर अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. 2 ऑगस्टला पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर पार पडणाऱ्या सुनावणीस मनोज जरांगे यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मनोज जरांगे मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास पुण्यात दाखल झाले आहेत. ते आज सुनावणीला हजर राहणार आहेत.
मनोज जरांगे मध्यरात्री 2 वाजता पुण्यात दाखल
मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती बरी नसताना देखील ते गुरुवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास पुण्यात दाखल झाले आहेत. आज ते पुणे सत्र न्यायालयात हजर राहणार आहेत.
विधानसभेसाठी जरांगे किती जागांवर निवडणूक लढवणार?
7 ऑगस्टपासून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या मराठा समाजासोबतच इतर समाजातील उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. राज्यभरातील सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय आणि तालुका निहाय इच्छुकांनी आपली माहिती अंतरवाली सराटीमध्ये आणून द्यावी लागणार आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) येत्या विधानसभा निवडणुकीत 150 ते 200 जागांवर उमेदवार उभे करणार आहेत. त्याचबरोबर 7 ऑगस्टपासून जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या शांतता रॅलीमध्ये सहभागी होऊन दौरा करणार आहेत.