Aries Weekly Horoscope 8 To 14 April : एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा संपून दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा नेमका कसा असणार आहे याची प्रत्येकाला उत्सुकता असते. राशीभविष्यातही ग्रहांच्या चालीनुसार प्रत्येक राशीचं साप्ताहिक भविष्य (Weekly Horoscope) कसं असणार आहे याचा साधारण अंदाज लावला जातो. त्यानुसार मेष राशीचा (Aries Horoscope) येणारा आठवडा नेमका कसा असणार आहे ते जाणून घेऊयात. 


मेष राशीचे करिअर (Aries Career Horoscope)


मेष राशीच्या लोकांना या आठवड्यात बढतीची संधी मिळणार आहे. त्यामुळे कामात मन लावून एकाग्रतेने काम करा. हलगर्जीपणा अजिबात करू नका. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. त्यामुळे या दरम्यान तुमच्या आहाराची देखील विशेष काळजी घ्या. अनेक दिवसांपासून तुमची जी प्रलंबित कामे आहेत ती वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 


मेष राशीचे लव्ह लाईफ (Aries Love Life Horoscope)


येणारा आठवडा मेष राशीसाठी चांगला असणार आहे. कौटुंबिक वातावरणात प्रसन्नता तर असेलच पण तुमच्या वैवाहिक जीवनातही ताणतणाव होणार नाहीत. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील. तसेच, जे तरूण मुलं-मुली प्रेमसंबंधात आहेत तुम्हाला लवकरच तुमच्या पार्टनरकडून एखादी भेटवस्तू मिळेल.  


मेष राशीची आर्थिक स्थिती (Aries Wealth Horoscope)


पुढच्या आठवड्यात मेष राशीच्या जीवनात आनंदी आनंद असणार आहे. देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव असणार आहे. कामात बढती मिळाल्यामुळे घरात पैशांची बरकत होईल. हा पैसा योग्य कामात गुंतवून ठेवा. भविष्यात तुम्हाला त्याची गरज भासू शकते. तसेच, जर तुम्ही पैशांचा गैरवापर केला तर लक्ष्मी तुमच्या घरी वास करणार नाही हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे मेहनतीने कमावलेला पैसा योग्य रितीने जपा. 


मेष राशीचं आरोग्य (Aries Health Horoscope)


आरोग्याच्या बाबतीत बोलायचं तर या आठवड्यात तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. तोंड, दात आणि हाडांमध्ये समस्याअसू शकतात. त्यामुळे आजार वाढू न देता त्यावर वेळीच उपचार करा. तसेच, बाहेरचे अन्नपदार्थ खाताना आरोग्याची काळजी घ्यायला विसरू नका. हा सल्ला देण्यात आला आहे.   


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Nandi Bull In The Temple : भगवान शंकराचं वाहन नंदी; पण मंदिरात नंदी बैल असण्यामागचं शास्त्रीय कारण तुम्हाला माहीत आहे का?