Jayant Patil : सध्या लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election)  रणसंग्राम सुरु आहे. अशातच विविध राजकीय घडामोडींना वेग आलाय. इंदापूर (Indapur) तालुक्यातील सोनाई ग्रुपचे (Sonai Group) सर्वेसर्वा असलेल्या माने कुटुंबीयांनी (Mane family) काल (5 एप्रिल) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट घेतली होती. ही भेट नेमकी का घेतली होती, हे अद्याप समजलं नाही. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिलीय. माने कुटुंबीय हे शरद पवार (Sharad Pawar) साहेबांचे कट्टर समर्थक राहिलेले आहेत. त्यांना आता जरी विचारलं तरी ते पवार साहेबच म्हणतील. पण आता वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर प्रेशर येत असेल असं जयंत पाटील म्हणाले. 


प्रवीण माने यांची आजची पत्रकार परिषद अचानक रद्द


दरम्यान, काल इंदापुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इंदापुरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मेळावा घेतला होता. यानंतर सोनाईच्या माने कुटुंबियांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रवीण माने हे आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार होते. नेमकी भेट का घेतली? यामध्ये नेमकं काय घडलं? हे स्पष्ट करणार होते. मात्र, आजची प्रवीण माने यांची पत्रकार परिषद अचानक रद्द झाली आहे. ही पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच याबाबत तारीख आणि वेळ कळवू असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळं माने कुटुंब आता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. 


इंदापुरचा भाग हा बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघातून राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत ही महत्वपूर्ण आणि तगडी मानली जातेय. याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. दरम्यान, या मतदारसंघात विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. तसेच त्यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका देखील घेतली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर विजय शिवतारे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच हर्षवर्धन पाटील देखील नाराज असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, फडणवीसांनी त्यांची नाराजी देखील दूर केली आहे. त्यामुळं हे दोन्ही नेते आता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करतील. मात्र, माने कुटुंबीय नेमका कोणाचा प्रचार करणार हे अद्याप समोर आलं नाही. त्यामुळं या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माने कुटुंबियांनी फडणवीसांची घेतलेली भेट महत्वपूर्ण मानली जातेय.


महत्वाच्या बातम्या:  


Devendra Fadnavis: बापासमोर लेक म्हणाली, विधानसभेचं काय? फडणवीस म्हणाले 2019 मधील हर्षवर्धन पाटलांचा पराभव आमच्याही जिव्हारी