Lok Sabha Election 2024 : महायुतीमध्ये (Mahayuti) छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) अखेर शिंदे गटाकडेच (Shinde Group) असणार असून, पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनाच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, उमेदवारी जाहीर करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासमोर एक अडचण निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. कारण संदिपान भुमरे यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभेतून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु असून, पण याचवेळी त्यांचा बालेकिल्ला म्हणजेच पैठण विधानसभा मतदारसंघ (Paithan Assembly Constituency) जालना लोकसभा मतदारसंघात (Jalna Lok Sabha Constituency) येते.
महायुतीत संभाजीनगरच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु आहे. अशात शिंदे गटाकडेच हा मतदारसंघ जाणार असल्याचे निश्चित झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिंदे गटाकडून संदिपान भुमरे आणि विनोद पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भुमरेंना 'मामा तुम्हीच लढा' असे म्हणत एकप्रकारे भूमरेंच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती समोर येत आहे. पण ज्या मतदारसंघातील मतदारांमुळे भुमरे राजकारणात मंत्री पदापर्यंत पोहचले, त्या पैठणच्या मतदारांचे मतदान मात्र जालना लोकसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात भुमरेंना मोठे कष्ट करावे लागण्याची चर्चा आहे.
भुमरेंना असा फायदा?
संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात कन्नड विधानसभा मतदारसंघ, छत्रपती संभाजीनगर मध्य, छत्रपती संभाजीनगर पश्चिम, छत्रपती संभाजीनग पूर्व, गंगापूर विधानसभा मतदारसंघ, वैजापूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. अशात वैजापूर, औरंगाबाद मध्य, पश्चिम हे तीनही मतदारसंघ शिंदे गटाच्या ताब्यात आहे. तसेच, पूर्व आणि गंगापूरमध्ये देखील मित्रपक्ष असलेल्या भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे याचा मोठा फायदा भुमरे यांना होण्याची शक्यता आहे.
विनोद पाटलांचे नाव मागे पडले?
संभाजीनगर लोकसभेतून मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील देखील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट मुंबईत जाऊन भेट घेतली. पण मागील आठवड्याभरापासून विनोद पाटील यांचे नाव मागे पडल्याचे दिसत आहे. भाजपकडून केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचे प्रयत्न सुरु असून, शिंदे गटाकडून संदिपान भुमरे यांचे नाव निश्चित असल्याचे बोलले जात आहे. असे झाल्यास विनोद पाटील काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: