Aries Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : हिंदू कॅलेंडरनुसार, सप्टेंबर महिन्यातला तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा मेष राशीसाठी नेमका कसा असणार आहे? मेष राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा मेष राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी मेष राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


मेष राशीचे करिअर (Aries Career  Horoscope)


नोकरीत अडचणी येऊ शकतात. नोकरदार लोकांना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. वरिष्ठांचे टोमणे टाळायचे असल्यास काळजी घ्या. तुमच्या हातून नकळत अशी चूक होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून फटकारलं जाऊ शकतं. पण बेरोजगार लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील, त्यांना नोकरी मिळू शकते. बेरोजगारांना या आठवड्यात नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात.


मेष राशीचे आर्थिक जीवन (Aries Wealth Horoscope)


मेष राशीच्या लोकांना या आठवड्यात चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. या आठवड्यात नशीब तुम्हाला साथ देईल. पण कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका. नीट अभ्यास करा आणि मगच पाऊल उचला, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात.


मेष राशीचे आरोग्य (Aries Health Horoscope)


नवीन आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याचीही चांगली काळजी घ्यावी लागेल. व्यायाम किंवा योगासनांना आपल्या जीवनाचा एक भाग बनवण्याचा प्रयत्न करा. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. या आठवड्यात तुमचा हॉस्पिटलचा खर्च वाढेल, त्यामुळे तुम्हाला स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागेल. आहारात पालेभाज्यांचा आणि फळांचा वापर करा.


मेष राशीची लव्ह लाईफ (Aries Love Horoscope)


या आठवड्यात तुमची लव्ह लाईफ रोमँटिक असेल. तुम्हाला जोडीदारासमोर तुमच्या भावना अधिक मोकळेपणाने मांडता येतील. तुमचे तुमच्या प्रियकरासोबत घट्ट भावनिक बंध निर्माण होतील. अविवाहित धनु राशीच्या लोकांना एखादी खास व्यक्ती आवडू लागेल, तुम्ही त्या व्यक्तीकडे आकर्षित व्हाल आणि कदाचित तुम्ही त्या व्यक्तीसोबत नातेसंबंधात याल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या