TCS News : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services) च्या हजारो कर्मचाऱ्यांना (Employees) आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. आयकर विभागाने TCS कर्मचाऱ्यांकडून 50 हजार ते 1.45 लाख रुपयांपर्यंतच्या कराची मागणी केली आहे. नोटिसा (Notice) मिळाल्यानंतर हजारो कर्मचाऱ्यांना कंपनीने कामावर राहण्यास सांगितले आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना सध्या कर मागणीची रक्कम न भरण्याचं आवाहन केलं आहे. जोपर्यंत आयकर विभागाकडून स्पष्टीकरण मिळत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी कर भरु नये, असे कंपनीने म्हटलं.


30 हजार कर्मचाऱ्यांना नोटिसा 


मिळालेल्या माहितीनुसार, टीसीएसच्या सुमारे 30 हजार कर्मचाऱ्यांना आयकर विभागाकडून नोटीस मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी टीसीएसकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. परंतू, कंपनीच्या एचआर विभागाने आयकर विभागाकडून मिळालेल्या नोटीसबाबत सर्व कर्मचाऱ्यांना अंतर्गत ईमेल पाठवल्याची माहिती आहे. प्राप्तिकर विभागाने पाठवलेल्या नोटीस आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत केलेल्या TDS कपातीशी संबंधित आहेत. दरम्यान, हे संपूर्ण प्रकरणाचे स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कर भरण्यास मनाई केली आहे. कराचा मुद्दा आयकर प्राधिकरणाकडे आधीच मांडला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना केलेल्या ईमेल मध्ये याबाबतची माहिती दिली आहे.


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! TCS मध्ये नोकरकपात होणार नाही, लवकरच आणखी भरती होणार