Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : नवीन आठवडा सुरू होणार आहे. सप्टेंबरचा तिसरा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. सप्टेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
या आठवड्यात तूळ राशीच्या लोकांनी आपला वेळ कुठेही वाया घालू नये आणि नको त्या गोष्टींवर आपली शक्ती वाया घालवू नये. प्रत्येक जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडा, कोणत्याही गोष्टीपासून पळ काढू नका. कोणताही निर्णय वेगाने घेऊ नका. प्रेमसंबंधात कडू-गोड भांडणं होतील.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
नवीन आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात बदल घडवून आणेल. या आठवड्यात तुमच्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं असू शकतं. या आठवड्यात तुम्ही स्वतःवर पैसे खर्च करू शकता. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा शुभ राहील. नोकरदारांना सहकाऱ्यांची साथ लाभेल.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्याचा असेल. या आठवड्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. मित्रांच्या मदतीने तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. या आठवड्यात तुम्हाला एखाद्या मोठ्या प्रकल्पात सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहील.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला करिअर आणि बिझनेसशी संबंधित मोठे निर्णय घ्यावे लागतील, जे घेण्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. या आठवड्यात तुमच्या मुलांना बढती मिळू शकते. तरुण मंडळी प्रियकरासोबत चांगला वेळ घालवतील.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांची नियोजित कामं या आठवड्यात पूर्ण होतील, त्यामुळे तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. मित्रांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या समस्या सोडवता येतील. जमीन आणि घराशी संबंधित वाद आणि समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र राहील. या आठवड्यात तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल तर तुमचा शोध संपेल. तुमचे तुमच्या प्रियकरासोबत सुरू असलेले गैरसमज दूर होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: