Angarak Yog : मेष राशीला 10 ऑगस्टला या 'धोकादायक योगापासून मुक्ती मिळेल
Angarak Yog :
Angarak Yog : अंगारक योग हा अशुभ आणि घातक योगांपैकी एक आहे, ज्याबद्दल ज्योतिष शास्त्रात सांगितले आहे. आतापर्यंत हा योग मेष राशीत तयार होत होता. त्याची फळे चांगली मानली जात नाहीत. मात्र आता मेष राशीच्या लोकांना काही तासांतच या धोकादायक योगापासून मुक्ती मिळणार आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये हा योग अशुभ फल देणारा मानला जातो. या योगामुळे कधी कधी एखादी व्यक्ती मोठ्या वादातही अडकते.
अंगारक योगामध्ये काय होते?
ज्योतिषशास्त्रानुसार, राहू आणि मंगळ हे अशुभ ग्रह संयोगाने असतात तेव्हा अंगारक योग तयार होतो. तो यावेळी मेष राशीत राहते म्हणून. जिथे राहूला गोंधळाचे कारण मानले जाते. दुसरीकडे, मंगळ हा क्रोध, धैर्य, युद्ध, रक्त इत्यादींचा कारक मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा हा योग तयार होतो तेव्हा व्यक्तीचे नाते बिघडते. दुखापत होण्याची भीती असते. जवळचे नातेवाईक, भावंडं यांच्याशी संबंध बिघडू लागतात. काही प्रकरणांमध्ये हा योग शुभ परिणाम देणाराही मानला जातो.
मेष राशीच्या लोकांची अंगारक योगातून कधी सुटका
होईल, पंचांगानुसार मंगळाने 27 जून 2022 रोजी मेष राशीत प्रवेश केला होता, आता मंगळ मेष राशीत आपली यात्रा पूर्ण करून वृषभ राशीत प्रवेश करेल. ज्योतिषीय गणनेनुसार, मंगळ 10 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 9:32 वाजता वृषभ राशीत प्रवेश करेल. त्यानंतर मेष राशीच्या लोकांना या धोकादायक योगापासून पूर्ण मुक्ती मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :