Angaraki Chaturthi 2026: आज 2026 वर्षातली पहिली अंगारकी चतुर्थी, चंद्रोदय वेळ, शुभ मुहूर्त, महत्त्व, यापुढील अंगारकी कधी असेल? जाणून घ्या..
Angaraki Chaturthi 2026: धार्मिक मान्यतेनुसार, मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी संबोधले जाते आणि तिचे पावित्र्य फार मोठे आहे. चंद्रोदय, शुभ मुहूर्त, महत्त्व जाणून घ्या...

Angaraki Chaturthi 2026: हिंदू धर्मात अंगारकी चतुर्थीला मोठे महत्त्व आहे. आणि आज 2026 वर्षातली पहिली अंगारकी चतुर्थी आहे, पंचांग आणि ज्योतिषशास्त्रानुसार ही चतुर्थी सर्वात प्रभावी मानली जातेय. धार्मिक मान्यतेनुसार, मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. मंगळ ग्रहाशी संबंधित त्या दिवशी केलेली श्री गणेशाची पूजा संकट निवारण, कर्जमुक्ती, आरोग्यलाभ त्याचबरोबर कार्यसिद्धीस हितकारक ठरते. साधारणपणे सहा महिन्यातून एकदा ही अंगारकी चतुर्थी येते. आजच्या दिवसाचे महत्त्व, चंद्रोदय वेळ, पूजेचा शुभ मुहूर्त सर्वकाही जाणून घ्या...
अंगारकी चतुर्थी शुभ मुहूर्त आणि चंद्रोदय वेळ (Angaraki Chaturthi 2026 Chandroday)
पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 6 जानेवारी रोजी सकाळी 7:01 वाजता सुरू होईल आणि पुढील दिवशी म्हणजेच 7 जानेवारीच्या दिवशी सकाळी 6:52 वाजता संपेल. या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 9:22 वाजता असेल. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्राच्या पूजेचेही विशेष महत्त्व आहे. चंद्राची पूजा केल्यानंतर आणि अर्घ्य अर्पण केल्यानंतरच हा उपवास सोडतात. असे म्हटले जाते की चतुर्थीचा उपवास चंद्रदर्शन आणि नैवेद्य दाखवल्याशिवाय अपूर्ण राहतो. म्हणूनच अंगारकी चतुर्थीचा उपवास चंद्रदर्शनानंतरच सोडला जातो.
अंगारकी चतुर्थी हा मोक्षदायक दिवस...
धार्मिक मान्यतेनुसार, मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी संबोधले जाते आणि तिचे पावित्र्य फार मोठे आहे. मंगळदोष असलेल्यांनी ह्या दिवशी केलेली श्री गणेशाची पूजा संकट निवारण, कर्जमुक्ती, आरोग्यलाभ त्याचबरोबर कार्यसिद्धीस गुणकारी मनाली जाते. अंगारकी चतुर्थी हा मोक्षदायक दिवस मानला जातो म्हणूनच या दिवशी महागणपतीची उपासना केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. गणेशासाठी उपवास केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि समाधानकारक जीवनाचे आशीर्वाद प्राप्त होतात.
2026 वर्षात कधी येणार अंगारकी चतुर्थी?
वैदिक दिनदर्शिकेनुसार, साधारणपणे सहा महिन्यातून एकदा चतुर्थी येते पण 2026 वर्षात ग्रह-नक्षत्रांच्या विशेष स्थितीमुळे तीन वेळा हा योग येत आहे. यावर्षी 6 जानेवारी, 5 मे आणि 29 सप्टेंबर ह्या तीन दिवशी अंगारकी चतुर्थी येणार आहे.
अंगारकी चतुर्थीचे व्रतविधी काय आहे?
- धार्मिक मान्यतेनुसार, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेश भक्त पहाटे लवकर स्नान करून श्री गणेशाची विशेष पूजा करतात.
- गणरायाला त्याचा आवडता नैवेद्य मोदक अर्पण केला जातो.
- गणेशाची मूर्ती किंवा चित्र फुलांनी सजवून आरती केली जाते.
- अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत पूर्ण उपवास केला जातो.
- चंद्रदर्शनानंतर उपवास सोडला जातो.
- या दिवशी चंद्रदेवाचीही पूजा केली जाते.
- चंदन, तांदूळ आणि फुले अर्पण केली जातात.
- काही भक्त फळे, दूध किंवा साबुदाणा खिचडी घेऊन अंशतः उपवास करतात.
- चंद्रोदयापूर्वी ‘गणपती अथर्वशीर्ष’ यासारखे वैदिक स्तोत्र पठण केले जाते.
- काही ठिकाणी गणेश याग किंवा यज्ञ आयोजित केले जाते.
हेही वाचा
Shubh Yog 2026: आज अंगारकी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योगसह जुळून आले अनेक शुभ संयोग, 3 राशींचं भाग्य फळफळलं, बाप्पाच्या कृपेने संकट दूर
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















